Home » क्रीडा » जळगाव येथे नाशिक महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जळगाव येथे नाशिक महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जळगाव, दि.२३( वास्तव पोस्ट न्यूज ) -जळगाव येथे नाशिक महसूल विभागीय स्पर्धेचे आज सकाळी उद्घाटन झाले. या स्पर्धेत नाशिक विभागातील पाच जिल्हे सहभागी झाले असून, ६०७ पुरुष खेळाडू तर १७७ महिला खेळाडू सहभागी आहेत. यात १४ क्रीडा प्रकार खेळले जाणार आहेत. त्यात ४८ सांघिक सामने , २०८ वैयक्तिक सामने असे एकूण २५६ सामने खेळवीले जातील .तसेच सांस्कृतिक स्पर्धाही होणार असून त्यात गायन, वादन, अभिनय, नृत्य, निवेदन, समुहगान, नाटीका आदिचा समावेश आहे. वैयक्तिक स्पर्धेमध्ये पहिले, दुसरे, तिसरे पारितोषिक असणार आहे. तर सांघिक स्पर्धेत विजेता आणि उपविजेता निवडला जाणार आहे.

ताणतणाव निवारण्यासाठी खेळ हा उपचार असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी खेळत राहावे, असे जळगाव मध्ये विभागीय महसूल स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले .या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, पोलीस परेड ग्राउंड व एकलव्य क्रीडा संकुलात होत आहेत. स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!