Home » क्राईम » एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव पोलिसांची तिघांविरुद्ध कारवाई

एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव पोलिसांची तिघांविरुद्ध कारवाई

जळगाव, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– पोलिसांकडून तिघा गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील राकेश मधुकर कोळी (रा. भोलाणे ता. जि. जळगाव), हुसेन सरदार तडवी (रा. चिलगाव ता. जामनेर) आणि सुरज अशोकराव भोगे ऊर्फ भांगे (रा. पापा नगर, राणी मोहल्ला, भुसावळ) अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत.

राकेश मधुकर कोळी याच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत सहा गुन्हे दाखल आहेत. हुसेन सरदार तडवी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत सोळा गुन्हे दाखल आहेत. राकेश कोळी यास छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. हुसेन तडवी यास मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे रवाना करण्यात आले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार सुरज अशोकराव भोगे ऊर्फ भांगे याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल आहेत. त्याची रवानगी मुंबई मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या तिघांच्या कारवाईच्या प्रस्तावकामी पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अधिपत्याखाली जळगाव विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, जळगाव उपविभागीय अधिकारी संदिप गावीत, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पाचोरा उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप,भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन आदींनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!