Home » सामाजिक » कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा

कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा

कजगाव | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज) दिपक अमृतकर : कजगाव येथे बस स्थानक परिसरात देखावा उभारून त्या ठिकाणी कजगावचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी बबनबाई जवहरीलाल हिरण शाळेचे मुख्याध्यापक एम.के. पवार तसेच शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावातील मुस्लिम बांधवांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन करत सलाेखा जपला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ तसेच महिला भगिनी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. संपूर्ण परिसर जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी दुमदुमून गेला हाेता. ग्रामपंचायत सदस्य मांगीलाल मोरे यांनी मनाेगत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!