Home » क्रीडा » राजकोट कसोटीत दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालचे तडाखेबंद द्विशतक ; टीम इंडिया मजबूत स्थितीत

राजकोट कसोटीत दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालचे तडाखेबंद द्विशतक ; टीम इंडिया मजबूत स्थितीत

राजकोट, दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामनातील दुसऱ्या डावात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने द्वीशतक झळकावले. यशस्वी जैस्वालने २३२ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. त्याने इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत दुसऱ्यांदा द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गजांचे विक्रम देखील आपल्या नावावर केले. आज भारताने ४ बाद ४३० धावा करून दुसरा डाव घोषित केला आणि पहिल्या डावाच्या १२६ धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडपुढे विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य ठेवले .

इंग्लंडविरुद्ध यशस्वी जैस्वालने रचला इतिहास
यशस्वी जैस्वालने जेम्स अँडरसनच्या एकाच षटकांत तीन षटकार ठोकले, याचबरोबर कसोटी सामन्यातील एका षटकात तीन षटकार मारणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला. यशस्वी जैस्वालने २३६ चेंडूत १४ चौकार आणि १२ षटकारांसह नाबाद २१४ राहिला. त्याचवेळी सर्फराझने ७२ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची खेळी केली. दोघांमध्ये १५८ चेंडूत नाबाद १७२ धावांची तुफानी भागीदारी केली.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरु असुन ५५७ धावांचा पाठलाग करतांना इंग्लंडची ४ बाद ४१ अशी अवस्था झाली आहे , रवींद्र जडेजा ने २, बुमराह ने १ गड़ी बाद केला तर डकेट हा सिराजकरवी धावबाद झाला .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!