Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » ब्रेकिंग: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा रिकामी; दुबईवर इराणचा बॅलिस्टिक मिसाईल्सचा मारा!

ब्रेकिंग: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा रिकामी; दुबईवर इराणचा बॅलिस्टिक मिसाईल्सचा मारा!

वास्तव पोस्ट l वृत्तसंस्था : आज आखाती देशांत भीषण लष्करी संघर्षाला सुरुवात झाली आहे. इराणने यूएई (UAE), कतार आणि बहरीन मधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. दुबई प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून ८२८ मीटर उंच असलेल्या बुर्ज खलिफा इमारतीतील सर्व पर्यटक आणि कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढले आहे. बुर्ज खलिफा परिसरात मोठा स्फोट झाल्याचे आवाज ऐकू आल्यानंतर इमारतीतील पर्यटकांना आणि रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले. इमारतीच्या जवळ ‘पाम जुमेराह’ भागात ढिगारा पडल्याचे वृत्त आहे.

इराणचा हल्ला:

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांनी अमेरिकेच्या अल-धफ्रा (UAE), अल-उदेद (कतार) आणि बहरीनमधील ५ व्या नौदल तळावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. एअर इंडियासह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे रद्द केली आहेत.

यूएई संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबीमध्ये क्षेपणास्त्राचा ढिगारा एका रहिवासी भागावर पडल्याने एका आशियाई नागरिकाचा मृत्यू झाला आहे. दुबई आणि अबू धाबीच्या आकाशात ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ सक्रिय झाली असून क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यूएई सरकारने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि खिडक्यांपासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे.

विमानतळ ठप्प:

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (DXB) आणि अल मकतूम विमानतळावरील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. भारताकडे येणारी आणि जाणारी विमानेही रद्द करण्यात आली आहेत. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली आहे की, एअर डिफेन्स सिस्टिमने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली, मात्र क्षेपणास्त्राचे अवशेष (Debris) रहिवासी भागात पडल्यामुळे एका आशियाई नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!