Home » आंतरराष्ट्रीय » ब्रेकिंग न्यूज : मध्यपूर्वेमध्ये युद्धाचा भडका! इराकवर अमेरिका आणि इराणचे भीषण हल्ले

ब्रेकिंग न्यूज : मध्यपूर्वेमध्ये युद्धाचा भडका! इराकवर अमेरिका आणि इराणचे भीषण हल्ले

वास्तव पोस्ट l नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढत असताना आज भारतीय वेळेनुसार भल्या पहाटे इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये हल्ला केला. मिळालेल्या वृत्तानुसार, इराणची राजधानी तेहरानमध्ये आज मोठा स्फोट झाला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी देशभरात आणीबाणीची घोषणा केली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या कार्यालयाजवळ हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यानंतर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर प्रतिबंधात्मक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत, त्यामुळे आता मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात राजनैतिक तोडगा काढण्यासाठी बोलणीचे प्रयत्न सुरू असतानाच इस्रायलकडून हा हल्ला झाला आहे.

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एका निवेदनात म्हटले की, इराणकडून निर्माण झालेल्या धोक्यांना निष्प्रभ करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. इस्रायलला धोका वाटत असल्यामुळे हा आगाऊ हल्ला करण्यात आला आहे. तसेच अमेरिकेशी समन्वय साधून सदर हल्ला केल्याचेही इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

इस्रायलच्या निशाण्यावर इरानचे संरक्षण ठिकाणे असून अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले आहे. तेहरान मध्ये पेट्रोल पंपवर लांब रांगा असून जीवनावश्यक वस्तुंसाठी लोकांची धावापळ सुरु आहे. समुद्र मार्गाने देखील हल्ले करण्यात आल्याचे कळते. इराणी राष्ट्रपती यांच्या निवास्तानावर देखील मोठ्ठा हल्ला करण्यात आला. मात्र या हल्ल्यावेळी राष्ट्रपती आपल्या निवास्थानी होते का, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान भारताने इराण मधील आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे सांगितले आहे. एकाचवेळी तब्बल तीस ठिकाणी हे हल्ले करण्यात आले. युद्ध जरी तुम्ही सुरु केले असले तरी ते बंद करू असा इशारा इराण कडून देण्यात आला असून लवकरच आम्ही प्रत्यूत्तर देऊ असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!