Headlines
Home » जळगाव जिल्हा » पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांचेकडून पाहणी

पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची मंत्री गिरीश महाजन यांचेकडून पाहणी

पाचोरा ( वास्तव पोस्ट ) : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु., वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी आदी गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मंत्री महाजन यांनी त्यांनी शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

दरम्यान बहुतांश भागात अजूनही शेतात पुराचे पाणी साचलेले असून, अनेक गावांमध्ये घरांची पडझड, पशुधनाची हानी, धान्य व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान, तसेच ग्रामीण रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी तसेच पंचनामे तातडीने पूर्ण व्हावेत, यासाठी मंत्र्यांनी प्रशासनास आवश्यक निर्देश दिले. तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी व ग्रामस्थांना शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे आश्वासन यावेळी दिले.

या प्रसंगी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!