Home » Archives for डिसेंबर 2025

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा नववर्षाच्या पूर्वसंधेला राज्यातील नागरिकांना संदेश

मुबंई ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नववर्षाच्या पूर्वसंधेला नागरिकांना समाजमाध्यमातून संदेश दिला आहे. ते आपल्या एक्स ( पूर्वीचे ट्विटर ) या हॅण्डलवर म्हणतात की… तमाम बंधू – भगिनींनो, गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले २०२५ हे वर्ष आता सरत आलंय, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवणारे…

Read More

अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन वेळेत व पारदर्शक पद्धतीने होणार : सचिव तुकाराम मुंढे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व कार्यशाळांमधील नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणे, नूतनीकरण न करणे तसेच पटनिर्धारणानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक व एकसंध कार्यपद्धती निश्चित केली आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे म्हणाले, यापूर्वी विविध शासन निर्णय,…

Read More

राज्यात १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत परिवहन विभाग, वाहतूक…

Read More

मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण व आनंद मेळावा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील मानव सेवा विद्यालयात हिवाळी क्रीडा पारितोषिक वितरण व स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, सचिव विश्वनाथ जोशी, कोषाध्यक्ष कमल कुमार पारख, सदस्य सुभाष पाटील,…

Read More

“जळगाव ओपन-२०२५” राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेची सुरवात ; राज्यभरातून २४३ खेळाडूंचा सहभाग

उद्घाटनाप्रसंगी डावीकडून विनित जोशी, ब्रिजेश गौर, रफिक शेख, प्रिती अग्रवाल, सचिन गाडगीळ, किशोर जाखेटे, रविंद्र धर्माधिकारी, किशोर सिंह, निकिता वाधवानी, दिपीका ठाकूर, चेतना शहा आदी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजीत योनेक्स सनराइज जी एच रायसोनी “जळगाव ओपन २०२५” बॅडमिंटन टूर्नामेंट चे उद्घाटन आज जिल्हा क्रीडा संघाच्या…

Read More

जिद्द आणि चिकाटीच्या बळावर, भारतीय लेकींनी कोरले क्रिकेट विश्वचषकावर नाव

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘Women’s T20 Cricket World Cup for the Blind 2025’ स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे महाराष्ट्राच्या वतीने स्वागत व अभिनंदन करून संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय संघाने एकही सामना न हरता अपराजित राहून अंतिम सामना फक्त १२…

Read More

अनुभूतीच्या एड्युफेअर मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी : प्रेम कोगटा

आकाशात फुगे सोडून उद्घाटन करताना डावीकडून रूपाली वाघ, रश्मी लाहोटी, निशा जैन, प्रेम कोगटा, अशोक जैन, अनिश शहा, मनोज दाडकर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून निर्माण केलेली शैक्षणिक जत्रा म्हणजे एड्युफेअर या उपक्रमातून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. यातून मुलांचे भविष्य घडविले जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायीक दृष्टीकोन दिसतो, असे कोगटा इंपोर्ट एक्सोपर्टचे…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : संविधान दिनाचे औचित्य साधत संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे युनेस्कोच्या पॅरिसमधील मुख्यालय प्रांगणात अनावरण करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना असून हा क्षण तमाम भारतीयांसाठी अभिमानाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’

खेळ, शिक्षण आणि सर्जनशीलतेचा संगम, मनोरंजनातून मिळणार ज्ञानाचे दर्शन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कौशल्याला आणि नवकल्पनांना व्यासपीठ देणारा ‘एड्युफेअर–२०२५’ हा भव्य शैक्षणिक व मनोरंजनात्मक उपक्रम दि. १९ ते २१ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. जळगाव शहरातील खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर सायंकाळी ४ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हा…

Read More

विज्ञान व तंत्रज्ञानामुळे शेतीला नवी दिशा :  अशोक जैन

जैन हिल्स येथे ‘कृषी महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी अशोक जैन, अजित जैन, शशिकांत पाटील व मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “शेतकऱ्यांनी जैन हिल्स येथील उच्च कृषितंत्रज्ञान पाहून त्याचा वापर आपल्या शेतात करावा. जेणे करून फायदेशीर आणि शाश्वत शेती करता येईल. या तंत्रज्ञानाचा फायदा स्वतः घ्यावा आणि इतरांनाही माहिती द्यावी,” असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक…

Read More

जैन हिल्स येथे २१ डिसेंबरपासून ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५

लिंबूवर्गीय शेतीच्या शाश्वत विकासावर मंथन, शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची असणार उपस्थिती जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देशातील लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ डिसेंबर २०२५ दरम्यान ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) चे आयोजन केले आहे. जैन हिल्स…

Read More

महाराष्ट्र विधानपरिषदेला १०० वर्षे पूर्ण ; परंपरा, चर्चा आणि निर्णयांचा वारसा

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज विधान भवन, नागपूर येथे महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ‘विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे’ या व्दितीय ग्रंथाचे प्रकाशन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषदेला १०० वर्षे पूर्ण होत असताना, या सभागृहातून संमत झालेली महत्त्वपूर्ण…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सहकाऱ्यांचे दिव्यांग मुलांसाठी सूत कताई प्रशिक्षण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकाऱ्यांतर्फे श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनानिमित्त (जयंतीनिमित्त) उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात सूत कताई प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. फाउंडेशनच्या विश्वस्त ज्योती अशोक जैन यांनी चरखा चालवून या उपक्रमाला औपचारिक सुरुवात केली. आठ दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणामुळे दिव्यांग केंद्रातील मुलांना स्वावलंबनाचा मार्ग खुला होणार आहे. रुशील…

Read More

नागपूरमध्ये अन्न-औषध सुरक्षेला आधुनिकतेची नवी ढाल

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘अन्न व औषध प्रशासन, नागपूर’ च्या विभागीय कार्यालय इमारतीचे लोकार्पण केले. खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्र सामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत. अन्न व औषधी प्रशासन, नागपूर विभागीय कार्यालयाची नूतन इमारत ५ मजली असून इमारतीचे बांधकाम १५००…

Read More

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

यशाचा मंत्र… शालेय गुणांसमवेत जीवनमूल्येही महत्वाची : मिनल करनवाल जळगाव (वास्तव पोस्ट ) : यशाची संकल्पना जास्तीत जास्त शालेय गुण मिळविणे हिच नाही तर त्यासोबत सकारात्मकता आणि जीवनमूल्ये देखील अत्यंत महत्त्वाची असतात. ती स्पर्धेच्या युगात मोलाची ठरतात. थॉमस एडिसन ने बल्बचा शोध लावला त्या आधी तो हजार वेळा अपयशी झाला होता, मात्र प्रयत्न करीत राहिल्याने…

Read More
error: Content is protected !!