जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल ; उत्पन्न, EBITDA आणि नफ्यात उल्लेखनीय वाढ
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड आणि तिच्या सहयोगी कंपन्यांनी ३० जून २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५–२६ च्या पहिल्या तिमाहीचे एकत्रित (Consolidated) आणि स्वतंत्र (Standalone) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनी मायक्रो इरिगेशन, पीव्हीसी व एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, अॅग्रो प्रॉसेसिंग, सोलर कृषी पंप, टिश्यूकल्चर रोपे, नूतनीकरणीय ऊर्जा आणि कृषी…
