पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी तत्काळ पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील जलस्रोतांचा योग्य वापर करून, सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून आणि तांत्रिक अडथळे दूर करून नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचा निर्णय जिल्हा नियोजन भवनमध्ये महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाचा आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,…
