जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेमेंट अँड रिसर्चमध्ये इन्फोसिस कंपनीतर्फे १५ दिवसांची स्कील डेव्हेलपमेंट विषयी आयोजित कार्यशाळेचा शुभारंभ झाला आहे. या कार्यशाळेत एमसीए, बीसीए आणि आयएमसीए चे ७० विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहेत.
पहिल्या १२ दिवसांसाठी मुंबईच्या मास्टर ट्रेनर जुतिका दास या स्कील डेव्हेलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स, इंटरव्ह्यू स्किल्स, कॉर्पोरेट कल्चर, व्यक्तिमत्व विकास, इंग्लिश डेव्हेलपमेंट आणि रेज्युमे रायटिंगवर ट्रेनिंग देत आहेत.

त्यानंतर बंगळूरूचे जयंथ गौडा हे एप्टीट्यूड टेस्ट, लॉजिकल रीजनिंग, क्यूटी, मैथ्स आणि बैंकिंग एक्झाम विषयी मार्गदर्शन करतील. ही ट्रेनिंग कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे निशुल्क असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आली आहे.
◆ तिसरी कार्यशाळा
आयएमआरमध्ये इन्फोसिस द्वारे घेण्यात येणारी ही तिसरी कार्यशाळा आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला इन्फोसिसतर्फे कार्यशाळा संपन्नतेचे प्रमाणपत्र आणि चार सेल्फ-डेव्हेलपमेंटची पुस्तके देण्यात येतील.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आयएमआरचे संचालक डॉ. बी.व्ही. पवार, अकादमीक डीन डॉ. तनुजा फेगडे, एमसीए हेड प्रा. उदय चतुर आणि इन्फोसिसच्या मास्टर ट्रेनर जुतिका दास उपस्थित होत्या. सूत्रसंचालन आणि कार्यशाळेचे संयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हेड प्रा.पुनीत शर्मा यांनी केले.
