मुंबई ( वास्तव पोस्ट ) : हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता मनोज कुमार यांचे दि ४, शुक्रवार रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मनोजकुमार हे त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. त्यांना भरत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते.
मनोज कुमार यांना ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असुन पहिला फिल्मफेअर पुरस्कार त्यांना १९६८ मध्ये ‘उपकार’ चित्रपटासाठी मिळाला. ‘उपकार’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २०१६ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
