Home » जळगाव » ३८ व्या नॅशनल गेम्स साठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

३८ व्या नॅशनल गेम्स साठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हीची ३८ व्या नॅशनल गेम्स क्रीडा स्पर्धा, देहरादून उत्तराखंड येथे बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे नियुक्ती करण्यात आली.

सोनलची या आधीही गोवा व गुजरात येथे नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स तसेच फिबा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. नुकतीच मेल मालदीव्स येथे आंतरराष्ट्रीय साबा वुमन्स डेव्हलपमेंट कॅम्प साठी भारतातुन चार महिला पंचां मध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

सोनलच्या नियुक्तीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राणे, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल.पी. देशमुख, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ.दिनेश पाटील, जैन स्पोर्ट्सचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, डाॅ. श्रीकृष्ण बेलोरकर, डाॅ. रणजीत पाटील, प्रा, यशवंत देसले, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा, प्रणव बेलोरकर, प्रा. सुभाष वानखेडे, रविंद्र धर्माधिकारी,व समस्त क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!