पाचोरा | दि १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील वयोवृद्ध महिलेस गोणपाट मध्ये टाकून अज्ञाताने जीवे मारल्याची धक्कादायक घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर बाजारपेठेत मज्जिद शेजारी मंजाबाई भोई ( वय ८०) या वृद्धा एकट्याच राहत होत्या. आज सायंकाळी नेहमी प्रमाणे त्या बाहेर दिसल्या नाहीत, तसेच घरातून कुठलाही आवाज न आल्याने शेजारच्यांनी घरात डोकावून पहिले असता ती वृद्ध महिला एका पोत्यात मृत अवस्थेत आढळून आली.
रहिवाशांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन करीत आहे.
