Home » राजकीय » नाशिक जिल्ह्यातील कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचा राजाभाऊ वाजेंना पाठिंबा

नाशिक जिल्ह्यातील कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचा राजाभाऊ वाजेंना पाठिंबा

नाशिक | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भोळे मंगल कार्यालय सिडको नाशिक येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा मेळावा सिटु चे जिल्हाध्यक्ष कॉ सिताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या मेळाव्यास महत्त्वाचे मार्गदर्शन सिटु चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कामगार कृती समितीचे नेते कॉ डॉक्टर डी एल कराड यांनी केले.

या मेळाव्या प्रसंगी कामगारांना मार्गदर्शन करताना कृती समितीचे नेते कॉ राजू देसले, कॉ देविदास आडोळे, कॉ मोहन देशपांडे, कॉ कासार, कॉ महादेव खुडे, उत्तम खांडबाहले, कॉ सुनील मालुसरे, कॉ कैलास मोहिते, कॉ भिवाजी भावले, कॉ दिनेश सातभाई, कॉ तानाजी जायभावे, कॉ हिरामण तेलोरे, कॉ आत्माराम डावरे, कॉ अरविंद शहापुरे, कॉ तुकाराम सोनजे, कॉ संतोष कुलकर्णी, कॉ संतोष काकडे, कॉ सतीश खैरनार, कॉ मोहन जाधव, कॉ राहुल गायकवाड, कॉ युवराज पाटील, कॉ छाया जाधव, कॉ कल्पनाताई शिंदे, कॉ निलेश मगर, कॉ अनिल भागवत, कॉ दगडू व्हडगर, कॉ दत्ता राक्षे, कॉ एकनाथ इंगळे तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्तात्रय गायकवाड, विलास शिंदे, देवानंद बिरारी या कामगार मेळाव्या मध्ये मोदी सरकारचा पराभव करुन महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंना येत्या २० मे रोजी कामगार व कामगार कुटुंबियांनी प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे निर्णय घेण्यात आला. मेळाव्यास उपस्थित कामगार व कामगार कुटुंब आणि कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!