Home » महाराष्ट्र » रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ! माकपा शिष्टमंडळाकडून खड्ड्यात वृक्षारोपण

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ! माकपा शिष्टमंडळाकडून खड्ड्यात वृक्षारोपण

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर, आनंद नगर, मोरेश्वर नगर, दामोदर नगर, स्वप्नपूर्ती नगर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तसेच इतर परिसरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. सिताराम ठोंबरे, सातपूर विभाग प्रमुख कॉ. डि. एन.व्हडगर यांनी भेट दिली.

यावेळी पाथर्डी फाटा येथील रस्त्यांची झालेली दुरावस्था बघितली. सर्वच परिसरामध्ये, रस्त्यांवर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.

यावेळी स्थानिक नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. गेल्या ३ वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे आज नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्याला सर्वस्वी राज्य सरकार व नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. असे तीव्र शब्दात नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या शाळेसमोर रस्ता, स्वप्नपूर्ती नगर व मोरेश्वर नगर येथे स्ट्रीट लाईट नाही, कॉर्पोरेशनच्या पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही, रस्ते नाही त्याकडे सुद्धा स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधले.

लवकरात लवकर या सर्व समस्यांचे निवेदन महानगरपालिका प्रशासनाला देण्यात येईल व समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन कॉ.सिताराम ठोंबरे, कॉ.दगडू व्हडगर व कॉ. आत्माराम डावरे यांनी स्थानिक नागरिकांना दिले.

यावेळी पक्षाच्यावतीने माकपाचे राज्य कमिटी सदस्य कॉ. सिताराम ठोंबरे, सातपूर विभाग प्रमुख कॉ.डी.एन.व्हडगर, शहर कमिटी सदस्य कॉ.आत्माराम डावरे, कॉ.दत्तात्रय कोंबडे, कॉ.अनिल पाटील, कॉ.ज्ञानेश्वर काजळे, कॉ.राजेंद्र पवार, कॉ.महेश पाटील,कॉ.ऋषिकेश भदाणे, कॉ.दीपक घोरपडे कॉ.एकनाथ इंगळे, कॉ.पंडित खडाळे तसेच स्थानिक रहिवासी विनोद बाऊस्कर, भैय्या पाटील, शरद ढोके, अरुण सिंग, विनोद भदाणे, अमोल पटाईत, तात्यासाहेब जगदाळे, शांताराम कुमावत, दीपक गवळी, मच्छिंद्र जाधव, मयूर पाटील, समाधान पवार, एकनाथ महाजन, मेगाराम बेवासी, नारायण दहिते, राजेंद्र मैल्ड, दत्तात्रय पाटील, प्रथम कडभाने, काशिनाथ पाटील, ललित देवरे, तुकाराम गोवर्धने तसेच इतर स्थानिक नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!