Headlines

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीचा कारागृहात खून !

कोल्हापूर ( वास्तव पोस्ट न्यूज ) : कोल्हापुरच्या कळंबा कारागृहातून एक धक्कादायक घटना आली आहे. कळंबा जेल हे वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत राहीले आहे. कधी या जेलमध्ये गांजा सापडतो, तर कधी पोलिसच कैद्यांना गांजा पुरवता, तुरुंगात मोबाईल फोन सापडल्याच्या घटना देखील येथे घडल्या आहेत. आता या जेलमध्ये चक्क कैद्यामध्ये भांडण होवून त्यात एका कैद्याचा खुन…

Read More

जळगाव जिल्ह्यातील सिकलसेल रुग्णांकडे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सिकलसेल आजाराने पीडित असलेल्या रावेर तालुक्यातील या पीडित रुग्णाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात योग्य सुविधा मिळत नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन लावत आपल्याला होत असलेल्या त्रासाची माहिती फोनवर दिली असता जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर यांनी रुग्णाचे सर्व ऐकुन घेतले, मात्र त्यांनी कोणतीही मदत न करता साधी प्रतिक्रियाही…

Read More

शिंदाड येथे शिवसैनिकांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. शनिवार दिनांक १ जून रोजी सायंकाळी शिंदाड येथे अनेक पदाधिकारी, जेष्ठ शिवसैनिक यांचे सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, संपर्क प्रमुख सुनील पाटील, उपजिल्हा…

Read More

रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप; मद्यधुंद अवस्थेत धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

वांद्रे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईमध्ये बॉलीवुड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या ड्राइव्हरने तीन जणांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाण केल्याचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडन ने वृद्ध महिलेवर हात उचलल्याचा आरोप या व्हिडीओत करण्यात आला आहे. दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रवीनाच्या…

Read More

एक्झिट पोलच्या आकड्यांनी इंडिया आघाडीचं टेन्शन वाढलं

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान आज संध्याकाळी पूर्ण झाले असुन येत्या ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्याआधी आज संध्याकाळी अनेक संस्थांनी आपले एक्झिट पोल जारी केले आहेत. या पोलची आकड़ेवारी बघता इंडिया आघाडीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. आज आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारी नुसार एन डी…

Read More

आयटी पार्क हिंजवडी येथून ३७ कंपन्या गेल्या राज्याबाहेर

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पिंपरी चिंचवड हिंजवडी येथील अनेक कंपन्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळं स्थलांतरित होत आहेत. आशियातील सर्वात मोठे आयटी हब असलेल्या पिंपरी चिंचवड हिंजवडी या ठिकाणी एकूण १५० कंपन्या असून पाच लाख कर्मचारी येथे काम करतात. या निमित्ताने हिंजवडीत परिसरात एक लाखाहुन अधिक कार आणि इतर वाहने कामासाठी ये जा करतात….

Read More

नाशिक मनपा’च्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ): नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस उपायुक्त अजित निकत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास उपायुक्त डॉ.मयूर पाटील, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, उपअभियंता सुनील खैरनार, नितीन गंभीरे, जयश्री…

Read More

नाशिकचे नवनियुक्त विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला पदभार

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिकच्या महसूल आयुक्त पदाचा कार्यभार राधाकृष्ण गमे यांच्याकडून डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला. गमे हे आज सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. डॉ. गेडाम यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले असून डॉ. गेडाम सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Read More

रक्तदान ही काळाची गरज : वैशालीताई सुर्यवंशी;युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला भेट

पाचोरा (वास्तव पोस्ट न्यूज ) : रक्तदान ही काळाची गरज असून सर्वांनी या मानवतावादी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी बोलत होत्या. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या वतीने शहरातील शिव मंदिर, दसरा मैदान…

Read More

अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य एम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक जी.टी.पाटील यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक एस.एस. केदार, एस.व्हीं. पाटील, ए.के. राजपूत, ग्रंथपाल दीपक पाटील, कनिष्ठ…

Read More

प्राचार्य एम के पवार सेवानिवृत्त ; विद्यालयाकडून निरोप समारंभ

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम के पवार हे आज सेवानिवृत्त झाले. त्यांनी चार वर्ष मुख्याध्यापक पदावर काम पाहिले. विद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश पाटील सचिव रत्नाताई पाटील उपाध्यक्ष दिनकर पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी सरांना…

Read More

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

जैन फूड पार्क येथे ३१ मे ‘जागतिक तंबाखूविरोधी दिन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यासपीठावर नितीन विसपुते आणि समोर कंपनीतील श्रोते सहकारी. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जगणे सोपे असते परंतु आपण ते कठीण करतो. पदरचे पैसे खर्च करून तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन त्याचा उपयोग करून कर्करोगासारख्या दुर्धर आजारास आपणच निमंत्रण देत असतो. जगभरात तंबाखूजन्य…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले अहिल्यादेवी होळकर यांना वंदन

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पिंपळगाव हरेश्‍वर येथील कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले. आज सर्वत्र पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील ग्रामपंचायत कार्यालयात…

Read More

मुंबईच्या ‘लाइफलाइन’वर ६३ तासांचा ब्रेक ; ९३० लोकल गाड्या होणार रद्द

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई च्या मध्य रेल्वे जनसंपर्क विभाग मुंबई यांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करून सांगितले की, मुंबई नेटवर्कवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे ३० मे च्या मध्यरात्रीपासून ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ६३ तासांत…

Read More

प्रभाकर चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथील रहिवाशी व मुळचे फैजपूर येथील प्रभाकर नामदेव चौधरी यांचे ३० मे रोजी सकाळी ६.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८२ वर्षांचे होते. फैजपूरच्या न.पा. हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते जैन…

Read More
error: Content is protected !!