कोरोनाचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा राज्यात दाखल

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात कोरोनाचा जेएन १ नंतरचा नवा व्हेरियंट केपी २ (फ्लर्ट) हा दाखल झाला असून या नव्या व्हेरियंटचे राज्यात आतापर्यंत एकूण ९१ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, जे लोक आधीच मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार यांसारख्या…

Read More

मतदान होताच कांद्याच्या दरात मोठी घसरण ; बळीराजाला मोठा फटका

सोलापूर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ येथे कांद्याला अत्यंत कमी दर मिळाला आहे. येथे एका शेतकऱ्याच्या ९३ कांद्याच्या पिशव्याची पट्टी फक्त १०००० रुपये आली आहे. त्यांच्या कांद्याला प्रतिकिलो १ ते ६ रुपयांचा दर मिळालाय. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. कांदा…

Read More

अचूक नियोजनातून करण पाटलांना मिळणार वाढीव मताधिक्य; पाचोरा मेळाव्यात निर्धार

पाचोरा | दि ११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सत्ताधार्‍यांबाबत जनतेत रोष असून प्रचार फेर्‍यांमध्ये लोक आपल्या सोबत राहतील असे दिसून आले आहे. तथापि, मतदानाआधीच्या शेवटच्या टप्प्यात गाफील राहू नका असा आवाहन वजा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाचोर्‍यात आयोजीत मेळाव्यात दिला. तर, अचूक नियोजन करून करण पाटील यांना वाढीव मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार देखील…

Read More

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) तर्फे राजाभाऊ वाजे यांना जाहीर पाठिंबा

नाशिक | दि. ११ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला. आज दिनांक ११ मे २०२४ रोजी श्रमिक नगर अशोक नगर परिसरात पक्षाच्या वतीने कामगार बंधू व कार्यकर्ते यांनी प्रचार पत्र वाटप केले. प्रचार पत्रक वाटप करताना लोकशाही वाचवा, देश…

Read More

सुरेश जैन यांचा महायुतीस पाठींबा ; ठाकरे गटास धक्का

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यात जळगाव लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदानाला दोन दिवस असतांनाच उद्धव ठाकरे गटास मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज दि.११ रोजी भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिल्याचे घोषित…

Read More

युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाशला सुवर्ण पदक

पुणे | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कझाकिस्तानमध्ये अस्तानात २२ वर्षांखालील युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाश गोरखाने सुवर्णपदक पटकावले. या मुष्टियुद्ध स्पर्धेत २२ वर्षांखालील गटामध्ये वर्चस्व राखत २१ पदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई केली. पुण्याच्या आकाशने ६० किलो गटाच्या अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या रस्लन कुझेउबाएवचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद जिंकले. मागील वर्षी…

Read More

जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात मतदानामुळे ११ ते १३ मे पर्यंत मद्यविक्री बंद

जळगाव | दि. १० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या ४८ तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी…

Read More

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा

मतदान करुन लोकशाही बलशाही करण्याची प्रतिज्ञा घेताना जैन इरिगेशनचे सहकारी जळगाव | दि. १० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रीक निवडणूकीत मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही. मतदान करणे संविधानाचा सन्मान असून, जैन इरिगेशनच्या सर्व सहकाऱ्यांकडून मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.जैन हिल्सच्या ॲग्री पार्क येथे सहकाऱ्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी आणि जळगाव…

Read More

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर ;भाजप व मित्र पक्षांचा पराभव अटळ : डॉ. डी.एल. कराड

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा इंडिया आघाडीचे नेते अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याच्या निर्णयाचे स्वागत माकपा नेते डॉ. डी एल कराड यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कट करुन अटक केली व तुरुंगात…

Read More

अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामिन मंजूर ; प्रचारासाठी लवकरच मैदानात

नवी दिल्ली | दि१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज संध्याकाळपर्यंत केजरीवाल बाहेर येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनमुळे आम आदमी पक्ष तसेच इंडिया आघाडीला मोठा फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आपल्याला प्रचार करण्याची…

Read More

सक्षम लोकशाहीसाठी मतदान करणे आपले कर्तव्य :अशोक जैन

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – “जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश या दृष्टीने आपल्या भारत देशाकडे सन्मानाने पाहिले जाते. भारतीय मतदात्याने नेहमीच आपली भूमिका चोख बजावलेली आहे. मतदान हा आपला अधिकार आहे आणि कर्तव्यही. मतदान करणे हा संविधानाचा सन्मान आहे. मतदानाच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी आपण योग्य लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतात. देशभक्त आणि…

Read More

शेतात लोंबकळणाऱ्या तारांमुळे शॉर्ट सर्किट ; आगित पिक व चारा जळून खाक

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव तालुक्यातील लमांजन शिवारात एका शेतातून गेलेल्या विज तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून शेतामध्ये आग लागली. या आगीत शेतातील पिक आणि चारा जळून खाक झाला असून त्यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे की लमांजन शिवारात हिलाल पाटील यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत…

Read More

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोन आरोपींना सश्रम जन्मठेप ; सबळ पुराव्याअभावी तीन निर्दोष

पुणे | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींपैकी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर ज्यांच्यावर कट रचल्याचा आरोप होता त्या वीरेंद्र तावडेसह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तीघांना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले….

Read More

राज्यातील राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी मशाल पेटवाविच लागेल : आदित्य ठाकरे

कर्जत | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे ह्यांच्या प्रचारार्थ कर्जतमधील टिळक चौकात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. ह्यावेळी प्रत्येक राज्यात निर्माण झालेली अस्थिरता, राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याला मशाल पेटवावीच लागेल, असं आवाहन आदित्य…

Read More

म्हसावद येथे महाविकास आघाडीकडून मशाल रॅली

जळगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील म्हसावद येथे जळगाव लोकसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून भव्य मशाल रॅली काढण्यात आली. सविस्तर वृत्त असे की २०२४ लोकसभा सार्वत्रीक निवडणुक जळगाव मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असुन जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण…

Read More
error: Content is protected !!