पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन आशीर्वाद घेतले.
गुरूपौर्णिमेनिमित्त येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. यात वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या सहकार्यांसह केंद्रात जाऊन दर्शन घेतले. याप्रसंगी सर्वाच्या सुख-समाधानासाठी त्यांनी श्री स्वामी समर्थ यांच्याकडे प्रार्थना केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
