जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मेटा (Meta) ने आपल्या वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हाट्सएप्प आणि इंस्टाग्राम वर AI आधारित एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. हे चिन्ह स्क्रीनवर उजव्या बाजुला निळे रिंग आयकॉनच्या रुपात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून दिली जाणारी ही सेवा आहे. या सेवेमुळे व्हाट्सएप्प आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. ही सेवा वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आणि मोफत देण्यात आली आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंसची सेवा वापरणे खूप सोपी आहे. यासाठी वापरकर्त्याला रिंग आयकॉनवर फक्त क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला परवानगी द्यावी लागेल आणि नेहमी सारखा चॅटबॉक्स उघडेल. या चॅटबॉक्स मध्ये तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकतात आणि फोटो तयार करण्यासाठी प्रॉम्प्ट लिहू शकता. AI तुमचा प्रॉम्प्ट वाचून ती प्रतिमा तयार करेल आणि तुम्हाला देईल. जर मेटा AI ला ती इमेज समजत नसेल, तर तो तुम्हाला संदेश पाठवेल की तो हा फोटो जनरेट करू शकत नाही.
◆ नवीन फिचरचा वापर कसा कराल :
◆ प्रश्नांची उत्तरे:
या नवीन सेवेद्वारे तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळवू शकता.
◆ विद्यार्थ्यांना अभ्यास होईल सोपा : या फीचर मुळे विद्द्यार्थी आपले कोणत्याही विषयावरील प्रश्न तसेच एखाद्या घटकाविषयी माहिती मिळवू शकतात. विडियो आणि लिंक च्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजेंस त्यांना मदत करणार आहे.
◆ फोटो तयार करणे : तुम्ही तुमच्या आवडीचा पाहिजे तसा फोटो तयार करू शकतात. फक्त एक प्रॉम्प्ट लिहा आणि AI तुमच्यासाठी फोटो तयार करेल.
◆ रेसिपी : खवैय्यांसाठी देखील उत्तम पर्याय असलेले हे फीचर आहे. तुम्हाला जी डिश आवडते किंवा बनवायची आहे, त्या डिश ची रेसिपी तुम्ही विचारून अगदी पुढच्या सेकंदाला सर्व माहिती तुम्ही मिळवू शकतात.
◆ मोफत सेवा : या फीचरच्या वापराकरीता तुम्हाला इतर कोणत्याही वेगळ्या AI प्लॅटफॉर्मचा किंवा एप्लिकेशनचा वापर करण्याची आवश्यता नाही. तुमच्या नेहमीच्याच व्हाट्सअप किंवा इंस्टाग्रामवर अगदी मोफत ही सेवा तुम्ही वापरू शकतात. कोणताही शुल्क तुम्हाला द्यावा लागणार नाही.
जर तुमच्या मोबाईल मध्ये हे अपडेट झाले नसेल तर या फीचर्स करीता तुमचे व्हाट्सअप आधी तुम्हाला प्ले स्टोअर मधून अपडेट करावे लागेल. यानंतरही जर नवीन फीचर ऍड झाले नसेल तर काही दिवसात लवकरच तुम्हाला ही सेवा वापरता येईल. मेटाने सुरुवातीला हे AI फीचर चाचणीसाठी लॉन्च केले असून कोणत्याही क्षणी ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. या नव्या फिचरमुळे इंस्टाग्राम आणि व्हाट्सअप वर सध्याचा जाणारा वेळ हा या नवीन अनुभवाने सत्कारणी नक्कीच लागेल.
