जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : थोर हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या लेखनातून मानवी जीवन आणि समाज याचे यथार्थ चित्रण झाले आहे. स्वातंत्रपूर्व काळात म.गांधी यांची विचारधारा आपल्या साहित्यातून मांडत प्रेमचंद यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील हिंदी विभागामधील प्रा.विजय लोहार यांनी केले. ते प्रेमचंद यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.रोशनी पवार यांनी देखील प्रेमचंद यांच्या जीवन आणि साहित्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ.मनोज महाजन यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.उज्वला पाटील यांनी केले. या वेळी मराठी विभाग प्रमुख डॉ.विद्या पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
