जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील सुप्रसिद्ध असलेली हॉटेल मराठा येथे हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत रुग्णसेवक माधवराव घोगरे त्याचप्रमाणे तेथील अन्य त्यांचे सहकारी यांनी आयोजित केलेल्या मानवतेचा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बाळापुर विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार निलेश देशमुख, ह.भ.प. सुखदास महाराज गाडेकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास समाजसेवक संतोष हुसे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर, ADCC Bank अकोला येथील संचालक डॉक्टर जयराज कोरपे, अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकरराव शेळके, डॉ. मिलिंद चौखंडे त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योजक गोपालजी झुनझुनवाला व शरद येथील महिला सरपंच सोनू सागर उपरवट यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाला पैठण येथील युवा शिव व्याख्याते के बी शेख व शेगाव येथील वरणकर गुरुजी प्रसिद्ध हास्य कवी यांच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.
महाराष्ट्र राज्यामध्ये सिकलसेल थॅलेसेमिया हिमोफिलिया सारख्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातील आदर्श बहुउद्देशीय संस्था गेल्या बारा वर्षांपासून विविध सामाजिक विषयांवर काम करणारी ISO नामांकित अग्रगण्य संस्था असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज सुभाष पाटील यांनी सन २०१८ पासून सिकलसेल मुक्त महाराष्ट्र अभियान सुरू केले असून या अभियानांतर्गत विविध सिकलसेल थॅलेसेमिया हिमोफिलिया रुग्णांसाठी ते अविरात्र काम करत आहेत या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी जवळपास ३१८ रुग्णांना मोफत बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी साठी प्रवृत्त केलेले आहे. जळगाव जिल्ह्यात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांनी मोफत ओपीडीची सोय रुग्णांना करून दिली आहे. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी या रुग्णांना ते मोफत चिक्की वाटप चा कार्यक्रम करत असतात. जेणेकरून त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील देखील तब्बल ७२८ रुग्णांना शालेय उपयोगी वस्तू चे वाटप मोफत करत असतात.
अकोल्या जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आई किंवा वडील किंवा दोन्हीही वारलेले आहेत अशा शून्य ते अठरा वयोगटातील बालकांसाठी बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून ते अकोला जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांच्या याच समाजकार्यामुळे प्रेरित होऊन मराठा हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत, रुग्णसेवक माधवजी घोगरे व त्यांच्या संपूर्ण टीमने दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचे औचित्य साधत मानवतेच्या सन्मान सोहळ्यासाठी त्यांना सत्कारमूर्ती म्हणून आमंत्रित केले होते.
जेष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, प्रणिता राठी पुणे, सुनील लांडे सेवा निवृत्त सैनिक भावलालजी इंदोरे PSI CRPF प्रकाश अवचार शेळद, ॲड.भारती देशमुख पातुर, शिवा कडू पारस, एबीपी माझा चे जिल्हा प्रतिनिधी उमेश आलोने यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
हॉटेल मराठा चे संचालक मुरलीधर राऊत व त्यांची संपूर्ण टीम अशा प्रकारचे उपक्रम दरवर्षी राबवत असते. समाजासाठी योगदान देणाऱ्या समाज कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतरांनी देखील समाजासाठी आपले योगदान द्यावे ही त्यांची भावना आहे. अकोला जिल्ह्यात देखील सिकलसेल, थॅलेसेमिया हिमोफिलिया मुक्त करण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील आदर्श व्यक्तींच्या माध्यमातून हे अभियान सुरू करण्याचा निर्धार केला आहे.
