जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी जळगाव महानगरपालिकेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही निवड केली.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पक्षफुटीनंतर जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु होती. अखेर कुलभूषण पाटील यांच्या रूपाने शिवसेना उबाठा पक्षास तरुण, तडफदार, मनमिळावू , तसेच जनतेच्या कामांसाठी सदैव तत्पर राहणारा आणि जनमानसात परिचित असा युवा चेहरा जिल्हाध्यक्षपदास मिळाला आहे.
कुलभूषण पाटील यांना कोणताही राजकीय वारसा नसतांना जळगाव उपमहापौर पदाच्या मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करत शहरात केलेल्या विकास कामांमुळे त्यांनी जळगाव राजकारणात आपली स्वतःची एक ओळख निर्माण केली. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यामध्ये पक्षास बळकटी तसेच संघटनास अधिक चालना मिळणार असून, पक्षाकडून मिळालेली जबाबदारी योग्यपणे पार पाडतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी व्यक्त केली आहे.
