Home » सरकारी योजना » ज‍िल्ह्यातील आद‍िवासी पाड्या – वस्त्यांना जोडण्यासाठी न‍िधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

ज‍िल्ह्यातील आद‍िवासी पाड्या – वस्त्यांना जोडण्यासाठी न‍िधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखड्याचा आढावा

जळगाव दि .३१ ( प्रतिनिधी ) ज‍िल्ह्यात ज्या आद‍िवासी पाड्या – वस्त्यांचा रस्त्याअभावी संपर्क तुटला असल्यास अशा गावांचे सर्वेक्षण करण्यात यावे. अशा गावांना जोडण्यासाठीच्या रस्ते कामांना ब‍िरसा मुंडा रस्ते व‍िकास योजनेतून शंभर टक्के न‍िधी उपलब्ध करून द‍िला जाईल. अशी ग्वाही राज्याचे आद‍िवासी व‍िकासमंत्री विजयकुमार गा‍व‍ित यांनी आज येथे द‍िले. त्याच शबरी घरकुल योजनेत ज‍िल्ह्यातील उद्द‍िष्ट वाढवून देणार असल्याचे ही त्यांनी सांग‍ितले.

जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक कार्यक्रम (आद‍िवासी उपयोजना) २०२४- २५ च्या प्रारूप आराखड्याबाबत मंत्रालयात आद‍िवासी विकासमंत्री व‍िजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत आद‍िवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे उपस्थित होते. जळगाव येथून आमदार श‍िर‍िष चौधरी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, यावल आद‍िवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अध‍िकारी अरूण पवार, ज‍िल्हा न‍ियोजन अध‍िकारी विजय श‍िंदे, ज‍िल्हा क्रीडा अध‍िकारी रवींद्र नाईक तसेच जिल्हा प्रशासनातील इतर सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ज‍िल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक कार्यक्रमात (आद‍िवासी उपयोजनेत) २०२४-२५ साठी २३ कोटींचा वाढीव‌ निधीची मागणी केली.‌

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!