जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओजस्विनी कला महाविद्यालयातील फाइन आर्ट्सच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल १०० टक्के लागला आहे.
फाइन आर्ट्स चौथ्या वर्षाच्या वार्षिक परीक्षेत बी.व्ही.ए. (पेंटींग) या विभागातील कुणाल विष्णू जाधव (८७ टक्के) या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक माधुरी बडगुजर ( ८५ टक्के) हिने तर तृतीय क्रमांक रिना बडगुजर (८३ टक्के) हिने मिळवला. शिल्प कला या विभागात देवा सुभाष सपकाळे ( ८८ टक्के) याने प्रथम क्रमांक पटकावला.
या गुणवंत विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख मिलन भामरे, प्रा.पुरुषोत्तम घाटोळ, प्रा.पीयुष बडगुजर, प्रा.डिगंबर शिरसाळे यांचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीच्या भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे
व विभाग प्रमुख मिलन भामरे यांनी शुभेच्छा दिल्या.
