Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » ‘फेडरल रिझर्व्ह’ने उघडले क्रिप्टोसाठी दरवाजे; ‘क्रॅकेन’ला थेट प्रवेश!​

‘फेडरल रिझर्व्ह’ने उघडले क्रिप्टोसाठी दरवाजे; ‘क्रॅकेन’ला थेट प्रवेश!​

​न्यूयॉर्क l वास्तव पोस्ट (विशेष प्रतिनिधी) : अमेरिकेची मध्यवर्ती बँक, ‘फेडरल रिझर्व्ह’ (Federal Reserve) ने इतिहासात प्रथमच एका क्रिप्टो-नेटिव्ह संस्थेला आपल्या मुख्य पेमेंट सिस्टिममध्ये थेट प्रवेश दिला आहे. Kraken Financial (Wyoming-chartered bank) या संस्थेला ‘फेडरल रिझर्व्ह मास्टर अकाउंट’साठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे. CNBC Crypto World च्या वृत्तानुसार, हा निर्णय केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण Crypto क्षेत्राला मुख्य प्रवाहातील वित्तव्यवस्थेने दिलेली ऐतिहासिक मान्यता आहे

🔹नेमका बदल काय होणार

आतापर्यंत जगभरातील क्रिप्टो एक्सचेंजेसना डॉलरचे व्यवहार करण्यासाठी (उदा. युजर्सनी पैसे जमा करणे किंवा काढणे) पारंपारिक बँकांवर (Intermediate Banks) अवलंबून राहावे लागत होते. या प्रक्रियेत वेळ आणि खर्च दोन्ही जास्त लागत असे. मात्र, आता फेडरल रिझर्व्हच्या मान्यतेनंतर, Kraken Financial थेट Fedwire सिस्टिमचा वापर करू शकेल. याचा अर्थ, डॉलर आणि क्रिप्टोमधील व्यवहार आता कोणत्याही मध्यस्थीशिवाय, थेट केंद्रीय बँकेच्या सिस्टिमद्वारे अत्यंत वेगाने आणि सुरक्षितपणे पूर्ण होतील.

🔹आंतरराष्ट्रीय व्यापक परिणाम

या निर्णयामुळे इतर क्रिप्टो कंपन्या, जसे की Custodia Bank (जी आधी अपयशी ठरली), साठी मार्ग मोकळा होऊ शकतो. ‘फोर्ब्स’ नुसार, हे डॉलरच्या डिजिटायझेशनचे संकेत आहे आणि व्योमिंगच्या SPDI मॉडेलची वैधता सिद्ध करते. सदर बातमीमुळे बिटकॉइन ची किंमत ७० हजार डॉलर्स च्या वर गेली. याआधी इराण युद्धाच्या भीतीमुळे मार्केटवर प्रभाव पडून थोडा उतार-चढाव झाला होता. PYMNTS च्या रिपोर्टनुसार, हे SPDI बँक मॉडेलचे सर्वात मोठे टेस्ट आहे.

हा बदल अमेरिकेला 'जागतिक क्रिप्टो राजधानी' बनवण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासनाने घेतलेला एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय ठरु शकतो. यामुळे बिटकॉइन आणि इतर क्रिप्टो मालमत्तांचे मूल्य आणि विश्वासार्हता वाढण्यास मोठी मदत होऊ शकते यात शंका नाही.
संदीप रंधे, वास्तव पोस्ट,
कार्यकारी संपादक

(विश्वसनीय स्रोतांवरून)

सतर्कता:
​’वास्तव पोस्ट’ पोर्टल कोणत्याही प्रकारची ‘क्रिप्टो करन्सी’त किंवा तत्सम आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. अशा कोणत्याही व्यवहाराशी किंवा गुंतवणुकीशी आमचा संबंध नसून, त्याबाबतची सर्वस्व जबाबदारी संबंधित व्यक्तीची किंवा वाचकाची राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!