Home » क्राईम » फैजपूर पोलिसांनी गहाळ झालेले १२ मोबाईल केले हस्तगत

फैजपूर पोलिसांनी गहाळ झालेले १२ मोबाईल केले हस्तगत

जळगाव, दि.१३ ( विशेष प्रतिनिधी ) समाधान पाटील | फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत या वर्षी आज पावेतो बरेच मोबाईल गहाळ झाल्याबाबत संबंधित मोबाईल धारकांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या. पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, जळगाव अप्पर पोलीस अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपूर उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी वेळोवेळी मासिक क्राईम मिटिंग दरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत करणेबाबत दिलेल्या सुचनेनुसार मोबाईल धारकांनी पुरविण्यात आलेल्या माहिती आधारे तांत्रिक विश्लेषण करून सायबर शाखा व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची मदत घेऊन फैजपूर पोलिसांनी एकुण १२ मोबाईल अंदाजे १लाख रुपये किंमतीची हस्तगत करुन ते मुळ मोबाईल धारकांस सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपूर उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या हस्ते परत करण्यात आले.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपूर उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनावरुन पोलिस स्टेशनचे ए.पी.आय निलेश वाघ, पी.एस.आय. विनोद गाभने, पो.हे.काॅ. गुलबक्ष तडवी, महिला पो.हे.काॅ. मदीना तडवी, महिला पो.हे.काॅ. हर्षा चौधरी, पो.काॅ. शारदा देवगिरे, पो.काॅ. जुबेर शेख तसेच वाचक शाखेचे पो.काॅ. गौरव पाटील व स्थानिक गुन्हाशाखेचे पोलिस नाईक ईश्वर पाटील यांनी मोबाईल हस्तगत करण्यात कामगिरी बजावली होती. ए.पी.आय.निलेश वाघ, पी.एस.आय.विनोद गाभणे, हेड कॉन्स्टेबल मदिना तडवी , हेडकॉन्स्टेबल हर्षा चौधरी, पोलिस महिला कॉन्स्टेबल शारदा देवगिरे आदींच्या हस्ते मुळ मालकांना कागद पत्रांची पडताळणी करून मोबाईल परत दिले. यावेळी मोबाईल धारकांनी पोलिस खात्याचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!