जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व्दारा आयोजित ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ या पुरस्कारा करीता उत्कृष्ट जिल्हाधिकारी या नामांकन प्रकारात नाशिक विभागात सर्वोत्तम कार्य केल्याबद्दल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे. बालहक्क संरक्षण तसेच जळगाव जिल्ह्यातील कुपोषण मुक्तीसाठी केलेल्या भरीव कार्याची दखल घेत, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सन्मानित केले आहे.
सदर पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे दि.०३ मार्च २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न होणार आहे. कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, मेघना बोडर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
