Headlines
Home » होम » मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केली घरकुल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केली घरकुल बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आज दि. २ एप्रिल, बुधवार रोजी घरकुल बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन प्रगतीची पाहणी केली. यावेळी घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची समीक्षा करण्यात आली. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिल्या.

गरजू लाभार्थ्यांना वेळेत घरे उपलब्ध करून देणे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दीष्ट आहे. घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देशही यावेळी देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!