Headlines
Home » जळगाव » चलो मुंबई: जिल्ह्यातील कंत्राटी कोरोना योद्ध्यांचा १२ मार्चला एल्गार

चलो मुंबई: जिल्ह्यातील कंत्राटी कोरोना योद्ध्यांचा १२ मार्चला एल्गार

जळगाव l वास्तव पोस्ट : “कोरोना काळात ज्यांनी देवदूतासारखी सेवा केली, ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता बाधितांचे प्राण वाचवले, अशा कंत्राटी कोरोना योद्ध्यांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.” शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कामावरून कमी केल्याने, आता जळगाव जिल्ह्यातील कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समितीने १२ मार्च २०२६ रोजी मुंबईत धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान जळगाव येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत या आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली. समितीचे मार्गदर्शक निलेश बोरा यांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, तालुकास्तरावरील नियोजित पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे.

तालुकानिहाय नियोजित पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते:

​मुंबई येथील आंदोलनासाठी आणि समितीच्या पुढील कार्यासाठी खालील नावांची नियुक्ती करण्यात येणार आहे:

  • पारोळा: रमेश वानखेडे, प्रेम वानखेडे
  • चाळीसगाव: सागर बळीराम पाटील
  • यावल (नायगाव/साकळी): भूषण पाटील, मिलिंद जंजाळे
  • फैजपूर: सागर चौधरी
  • सावदा: युगल जावळे
  • मुक्ताईनगर: प्रकाश मडावी, विक्की पाटील
  • बोदवड: डॉ. तनवीर शेख, विनोद ढगे, समीर शेख
  • बोदवड (जलचकर तांडा): मुकेश कांबळे, आकाश बाविस्कर
  • भुसावळ: किरण जाधव
  • रावेर (विवेरे): शब्बीर खान, सोनल बारेला
  • चोपडा: जयवंत मराठे
  • अमळनेर (दहिवद): प्रशांत सोनवणे
  • पाचोरा: शंतनु राजपूत
  • एरंडोल: दिपक महाजन
  • भडगाव: अमोल निकम, गौरव धनगर
  • जामनेर: वैभव जयप्रकाश देशपांडे, सागर बळीराम चौधरी
  • पहूर (जामनेर): सागर वानखेडे
  • धरणगाव: धनलाल चव्हाण, अनिल बडगुजर

बैठकीतील प्रमुख उपस्थिती:

या बैठकीला निलेश बोरा, विनोद सपकाळे, युवराज सुरवाडे, सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक सपकाळे, रमेश वानखेडे, बबन सावळे, यश कुमावत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख मागण्या:

​१. केंद्र शासनाच्या ३ मार्च २०२१ च्या पत्रानुसार, १०० दिवस सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने शासन सेवेत सामावून घ्यावे.

२. महाराष्ट्र शासनाने कोणत्याही अटीशिवाय या बेरोजगार कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

३. प्रलंबित असलेला समावेशनाचा निर्णय तातडीने घ्यावा.

मुंबईत घेणार मंत्र्यांची भेट:

येत्या १२ मार्च रोजी मुंबईत जाऊन जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन समितीच्या वतीने आग्रही मागणी करण्यात येणार आहे.

​”आम्ही आमचा पहिला जॉब सोडून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. आता आमचे कुटुंब देशोधडीला लागले आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”
कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समिती, जळगाव.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!