Home » होम » विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संत रविदास महाराज यांची जयंती साजरी

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : संत रविदास महाराज यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये पोचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन काहूरखेडा ता. भुसावळ येथील राधाकृष्ण संत शिरोमणी गुरु रविदास मंदिर यांच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला वस्त्र उद्योगमंत्री संजय सावकारे आमदार चंद्रकांत पाटील, दिपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर, डॉ. संजीव भटकर, नेहरू विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुरेश अहिरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील भिरुड उपस्थित होते.

संत रविदास महाराजांनी देशात असलेली विषमता जातीभेद नष्ट करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडत असताना समाजाचा विचार केला पाहिजे, यासह विविध विषयांवर मान्यवरांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी छोट्या स्वरूपात शैक्षणिक साहित्याची भेट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

सायंकाळी ह.भ.प. पंकज महाराज मुक्ताईनगर यांचे कीर्तन संपन्न झाले. या कीर्तनातून पंकज महाराजांनी समाजातील सलोखा राहिला पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीची जोपासना केली पाहिजे यासह विविध विषयावर यावेळी माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!