Headlines
Home » जळगाव

परधाडे – माहीजी स्थानका दरम्यान कर्नाटक एक्सप्रेस खाली चिरडून ११ प्रवाशांचा मृत्यू !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव पासून ३५ किलोमीटर अंतरावर परधाडे ते माहेजी या रेल्वे स्थानका दरम्यान भीषण दुर्घटना घडली असून यात ११ रेल्वे प्रवासी मृत तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. यात जखमींची अवस्था बघता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनूसार आज बुधवार दि २२ रोजी संध्याकाळी ५ वाजता अचानक पुष्पक…

Read More

जीवनात यश आणि अपयश पचविण्याची क्षमता खेळा मुळेच येते : जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेस जिल्हा क्रीडा संकुल येथे आज उत्साहात सुरवात झाली. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा…

Read More

केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे हिवाळी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, संलग्नित केसीईसोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव, राष्ट्रीय सेवा योजनाविभागाकडून दि १५ जानेवारी ते दि २१ जानेवारी या कालावधी मध्ये दत्तक गाव मोहाडी येथील कै.गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय मोहाडी, ता.जि. जळगाव येथे हिवाळी श्रम संस्कार शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ….

Read More

CAS अंतर्गत प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीबाबत अन्याय ; एन मुक्ताचे शिक्षण सहसंचालकांना निवेदन

सहसंचालक शिक्षण विभाग जळगाव यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष तथा प्राध्यापक जळगाव ( वास्तव पोस्ट ) : CAS अंतर्गत प्राध्यापकांचे उद्बोधन व उजळणी वर्ग वेळेवर न झाल्यामुळे स्थाननिश्चिती रुजू दिनाकांपासून दिली गेली नाही, उद्बोधन व उजळणी वर्ग झालेल्या दिनाका पासून करण्यात आली. तरी सदरील शासन परिपत्रकानुसार सर्व प्राध्यापकांना त्यांच्या मुळ दिनांकापासून स्थाननिश्चिती देण्यात यावी, अशी…

Read More

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराला सुरुवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी शिबिराचे शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात उद्घाटन निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे अध्यक्ष अशोक बारी, मुख्याध्यापक आर.एस. आंबटकर, डॉ.डी.आर. क्षीरसागर, कार्यक्रमाधिकारी प्रा.जी.व्ही. धुमाळे,…

Read More

बेघरांच्या स्वप्नातील ‘अमृत महाआवास योजना’ १०० टक्के यशस्वी करा : मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव (वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान स्वामित्व योजनेमुळे प्रत्येक गावाच्या गावठाणातील सर्व नमुना ८ अद्ययावत होवून ग्रामपंचायती मालमत्ता कर मिळून ग्राम्य पंचायतीचे स्वत:चे उत्पन्न वाढेल. शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होवून ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होईल. जिल्ह्यात जवळपास दिड लाख घरे यावर्षी बांधणार आहोत. लाभार्थी, गवंडी, साहित्य पुरवठादार यांचे मेळावे घेवून मोहीम स्वरूपात कामे सुरु करावीत….

Read More

२० जानेवारी रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या २० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या…

Read More

इंधन बचत करा अन्यथा संकटाला सामोरे जा : सुनील वानखेडे

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी भुसावळ : जगामध्ये वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या वाढली आहे, यामुळे खनिज तेलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. खनिज तेलाचे साठे हे मर्यादित असून भविष्यात संपण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून इंधन बचत करा, अन्यथा संकटाला सामोरे जा असे प्रतिपादन सुनील वानखेडे यांनी केले. दि१६…

Read More

मूळजी जेठा महविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘चैतन्य -२०२५’ तरुणाईच्या जल्लोषात संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महविद्यालयामध्ये दि.१७ आणि १८ जानेवारीला चैतन्य- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात दोन दिवस विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा आविष्कार पहावयास मिळाला. या कार्यक्रमाच्या समारोपावेळी जळगावच्या उप जिल्हाधिकारी अर्चना मोरे आणि जळगावचे अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते उपस्थित होते. समारोपावेळी अर्चना मोरे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हटल्या की,…

Read More

केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गेल्या ३० वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी टिश्युकल्चर, ठिबक सिंचन, फर्टिगेशन व हायटेक पॅकेज ऑफ प्रॅक्टीसेस, फ्रुट केअर मॅनेजमेंट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आणि निर्यात या क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून केळी पीक क्लस्टर योजनेमुळे जळगाव जिल्हा हे केळी निर्यातीचे हब म्हणून जगाच्या बाजारपेठेत नावलौकीक मिळवेल.निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे…

Read More

इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘इनरव्हील डे’ निमित्त वृद्धाश्रमामधील आजी-आजोबांशी संवाद साधून त्यांच्यासोबत वेळ घालविता यावा यासाठी इनरव्हील क्लब जळगावचे अध्यक्ष उषा जैन यांच्यासह सदस्यांनी सावखेडा शिवारातील मातोश्री आनंदा आश्रमाला भेट दिली. सचिव निशिता रंगलानी, सीसी रंजन शाह, प्रोजेक्ट चेअरमन नूतन कक्कड व क्लब सदस्यांची उपस्थिती होती. नुतन कक्कड यांनी भोजनाची व्यवस्था करुन दिली….

Read More

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन ; वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा : डॉ.महेश्वर रेड्डी

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व्यासपीठावर डावीकडून विराज कावडिया, अशोक नखाते, संदीपकुमार गावित, सी.एस.नाईक जळगाव ( वास्तव पोस्ट ) : विद्यार्थ्यांनी सिगारेट व इतर व्यसनांपासून दूर राहावे, वाहतुकीचे नियम पाळावेत, आणि पोलिस दलात करिअर घडवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित शस्त्र,…

Read More

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पोलीस स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दि.१७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:४५ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत शहरातील पोलीस स्केटिंग ग्राऊंड, पोलीस मुख्यालय, नवीन बस स्टॅन्ड समोर, जळगाव येथे शस्त्र, श्वानपथक, पोलीस बँड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस यंत्रणा यांचे प्रदर्शन जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व…

Read More

वार्षिक स्नेहसंमेलन २०२५ : विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषांमुळे मू.जे. महाविद्यालय झाले बॉलीवूडमय

पुष्पा आणि श्रीवल्ली जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महविद्यालयामध्ये चैतन्य २०२५ वार्षिक स्नेहसंमेलना अंतर्गत आज विद्यार्थ्यांनी बॉलीवूड मधील विविध पात्रांची वेशभूषा करून महाविद्यालयामध्ये नवचैतन्य निर्माण केले. जुन्या आणि नव्या चित्रपटामधील विविध नायक-नायिका, खलनायक आणि विनोदी पात्रांची वेशभूषा करून विद्यार्थी महाविद्यालयात आले होते. यावेळी महाविद्यालयात बॉलीवूड थीम वर आधारित स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात…

Read More

वावडदे महावितरण उपकेंद्रास सहव्यवस्थापकीय संचालक यांची भेट

वावडदे ( वास्तव पोस्ट ) : जळगाव तालुक्यातील वावडदे येथे महावितरणाच्या सब स्टेशन येथे आज बुधवार दि.१५ जानेवारी रोजी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे IAS यांनी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी जळगाव झोन व अधीक्षक अभियंता अनिल महाजन जळगाव, तसेच वावडदा कक्ष कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आकाश सोनवणे यांनी भेट दिली. या भेटीत वावडदा विभाग प्रधानमंत्री किसान ऊर्जा…

Read More
error: Content is protected !!