Home » क्रीडा

एमसीए कडून राज्यभरातील स्कोअरर्ससाठी सुवर्णसंधी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील क्रिकेट स्कोअरर्ससाठी राज्य पॅनलमध्ये सहभागी होण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मे २०२५ मध्ये होणाऱ्या स्कोअरर्सच्या परीक्षेद्वारे पात्र उमेदवारांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय पॅनलमध्ये स्थान मिळणार आहे.  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून या परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून,…

Read More

५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनला दुहेरी मुकूट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ५२ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेच्या आंतर संस्था सांघिक विजेतेपद गटात जैन इरिगेशनच्या पुरुष व महिला या दोन्ही संघांनी दैदीप्यमान अशी कामगिरी करताना दोन्ही गटात विजेतेपद पटकाविले. नवी दिल्ली येथे दि. १७ ते २१ मार्च दरम्यान संपन्न झालेल्या जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या संघाचा…

Read More

जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघांने ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघ (डावीकडून) घनश्याम चौधरी, वरूण देशपांडे, अनंत तांबवेकर व मुख्य प्रशिक्षक समद फल्ला जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघाने रिलायन्स ग्रृप स्पोर्टस क्लबच्या संघावर तीन विकेट ने विजय प्राप्त करून  प्रतिष्ठित अशा द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात…

Read More

टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला नमवत आईसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले

दुबई ( वास्तव पोस्ट ) : येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने चार गडी राखत दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. आजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते. डॅरिल मिशेल…

Read More

ऑस्ट्रेलिया ला तुडवत भारत आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये

दुबई ( वास्तव पोस्ट ) : विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या विजयासह भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिला आणि अंतिम फेरीत पोहोचला. भारताने २६५ धावांचे लक्ष्य ४८.१ षटकांत ६ गडी गमावून पार केले. यासह मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला स्थान मिळवण्यात यश मिळण्याची…

Read More

स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तिसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचे २५ फेब्रुवारी २०२५ ते २ मार्च २०२५ दरम्यान आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यामार्फत केले होते. या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा पोलीस कवायत मैदान व अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर घेण्यात आली….

Read More

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने पाकला लोळविले ; विराट कोहलीचे नाबाद दमदार शतक !

दुबई ( वास्तव पोस्ट ) : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. यासह, संघाने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात १८० धावांनी पराभवाचा बदला घेतला. रविवारी दुबईमध्ये पाकिस्तानने २४१ धावा केल्या. भारताने ४२.३ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून विराट कोहलीने नाबाद १००, श्रेयस अय्यरने ५६ आणि शुभमन गिलने ४६…

Read More

“आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” मध्ये टीम इंडियाची विजयी सलामी ; गिलचे शानदार शतक

दुबई ( वास्तव पोस्ट ) : भारतीय क्रिकेट संघाने ICC Champions Trophy 2025 मध्ये शानदार सुरुवात केली आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजयाने सुरुवात केली. भारताच्या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. गिलने शानदार खेळी करत सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी शतक झळकावण्याचा महान…

Read More

राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे १६ वर्ष वयोगटातील ३५ व्या राज्यस्तरीय किशोर किशोरी कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. किशोर गटाची स्पर्धा स्व.ॲड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या मैदानावर तर किशोरी गटाची स्पर्धा आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली. किशोर गटात २८ तर किशोरी गटात १२ संघ,…

Read More

३८ व्या नॅशनल गेम्स साठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हीची ३८ व्या नॅशनल गेम्स क्रीडा स्पर्धा, देहरादून उत्तराखंड येथे बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे नियुक्ती करण्यात आली. सोनलची या आधीही गोवा व गुजरात येथे नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स…

Read More

तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्या : पालकमंत्री जयकुमार रावल

नाशिक विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शानदार शुभारंभ… धुळे ( वास्तव पोस्ट ) : “प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातून किमान एक तास खेळासाठी द्यावा, यामुळे कार्यक्षमता वाढेल आणि प्रशासन अधिक गतीमान होईल,” असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. नाशिक विभागीय महसुल क्रीडा व…

Read More

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत २४ शाळांनी भाग घेतला होता. यामध्ये अनुभूती निवासी स्कूल च्या खेळाडूंनी फाईट ९ गोल्ड,५ सिल्व्हर, ३ कांस्य, पुमसे मध्ये मुलं-मुली मिळून पहिला क्रमांक प्राप्त करत ४ सुवर्ण, १ रौप्य,१ कांस्य पदकांची कमाई करत घवघवीत यश…

Read More

वानखेडे मैदानावर अभिषेक शर्माची वादळी खेळी ; भारताचा सलग १७ वा मालिका विजय !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ५ व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजय मिळविला. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि ५ व्या T20I सामन्यात भारताने इंग्लंडचा वाईट रीतीने पराभव करून मोठी कामगिरी केली. प्रथम फलंदाजी…

Read More

महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारत विश्वविजेता

मलेशिया ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ ८२ धावांत गारद झाला….

Read More

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे क्रीडा आयुक्तांचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग तसेच संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे, त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवा धोरणा अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतात….

Read More
error: Content is protected !!