Headlines

केसीई इंजिनिअररिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील पॉलिटेक्निक विभागातील विद्यार्थ्यांचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इंजिनिअररिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उन्हाळी अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवले. यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कॉम्पुटर ब्रांचमधील दलाल अचल राजेश ८६.४, पाटील भाविनी ज्ञानेश्वर ८५.८८ टक्के, पाटील भावेश सतीश ८४.२४ टक्के, इलेक्ट्रॉनिक्स अँड…

Read More

केसीई अभियांत्रिकी व व्यवस्थापनाच्या ११ विद्यार्थ्यांची ट्रेनी ऑफिसर पदासाठी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाने एल अँड टी फायनान्स आणि एक्सलन्स एचआर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन केले होते. यात ट्रेनी ऑफिसर पदासाठी ११ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातील जनरल मॅनेजमेंट, फिनटेक मॅनेजमेंट आणि ऍग्री बिजनेस मॅनेजमेंट या विभागातील विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे…

Read More

ए.टी. झांबरे विद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच अतुल पाटील आणि पराग राणे यांनी शाहू महाराज यांच्या जीवन कार्याबद्दल…

Read More

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कुलगुरुंना निवेदन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगर तर्फे प्र. कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांना कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा संबंधी समस्यांना घेऊन एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुख्यत्वे परीक्षा विषयक उडालेला गोंधळ, उत्तर पत्रिकेची गुणवत्ता पूर्ण तपासणी तसेच परीक्षेला उपस्थित असूनही अनुपस्थित दाखवलेल्या विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मांडण्यात आले. येत्या…

Read More

चोवीस वर्षांनी वर्गमित्र आले एकत्र

चांदवड ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे तब्बल चोवीस वर्षांनी दिघवद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावी ब च्या वर्गातील मित्र व मैत्रिणी एकत्र आले. निमित्त होते शाळेविषयी व शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व धकाधकीच्या आयुष्यात एक दिवस आपल्या बालमित्रांना भेटण्यासाठी. तब्बल चोवीस वर्षांनी सर्वजण एकत्र आले व एकमेकांना भेटले. सर्वांना…

Read More

एपीजे केवायएस च्या चेअरमन पदी सुनील वानखेडे यांची निवड

वरणगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सुनील वानखेडे यांची ‘एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट’च्या चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडियाच्या वतीने देशभरात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व गणित या विषयाची जनजागृती करण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट…

Read More

प्रा. राजेंद्र चिंचोले ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले हे नुकतेच आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पिंपळगाव हरेश्वर येथील महाविद्यालयात आयोजित सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थित राहून निरोपप्रसंगी भेटवस्तू देऊन पुढील आयुष्यासाठी…

Read More

‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी प्राचार्या सुषमा कंची यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :युनिव्हर्सल मेंटर्स असोसिएशन मुंबई, यांच्या वतीने मुंबईत एका शैक्षणिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील सीबीएसई स्कूलच्या काही निवडक प्राचार्यांना ‘प्रिन्सिपल ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमामध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांना देखील युनिव्हर्सल मेंटर्स असोसिएशनचे सीईओ संदीप गुलाटी यांच्या…

Read More

जिल्हा परिषदेच्या किन्ही येथील शाळेत “शाळा प्रवेशोत्सव” उत्साहात साजरा

भुसावळ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भुसावळ तालुक्यातील किन्ही येथे जि.प.शाळेत ‘शाळापूर्व तयारी मेळावा व प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आजपासून सुरु झाले. उन्‍हाळी सुटी संपून आज शाळा पुन्‍हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्‍याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागताची जय्यत तयारी केली होती. किन्ही…

Read More

मानव सेवा मंडळ जळगाव संचलित मानव सेवा शिशुविकास, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात “शाळा प्रवेशोत्सव “उत्साहात साजरा

A new academic year begins : उन्‍हाळी सुटी संपून आजपासून शाळा पुन्‍हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्‍याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्‍या स्‍वागताची जय्यत तयारी केली होती. ढोलताशांच्‍या गजरात व विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्‍वागत करण्यात आले. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शालेय स्‍तरावर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ला आजपासून सुरवात झाली…

Read More

मित्र मैत्रिणींनी एकमेकाला दिली साथ ; म्हणूनच आज २७ वर्षानंतर झाली सर्वांची भेट एकसाथ !

GET-TOGETHER : व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून संपर्क साधून श्री गो से हायस्कूल पाचोरा, या शाळेतील १९९६-९७ मधील दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून “दोस्त माझे मस्त” स्नेह मेळाव्याचे आयोजन. पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल च्या सन १९९६-९७ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा “दोस्त माझे मस्त” हा स्नेह मेळावा दैवयोग मंगल…

Read More

कजगाव येथे बबनबाई जवरीलाल माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी विद्यार्थिनींकडून स्नेहसंमेलन

कजगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी | दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०००-२००१ या बॅचचे दहावीचे विद्यार्थी तब्बल २३ वर्षांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र जमले. जवळपास चाळीशीच्या उंबरठयावर असलेले सर्व मित्र एकत्र येत बालपणाच्या आठवणीत रमले. गावातुन बाहेरगावी नोकरी निमित्त गेलेले, सासरी गेलेल्या मुलीही या…

Read More

प्राचार्य एम के पवार सेवानिवृत्त ; विद्यालयाकडून निरोप समारंभ

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम के पवार हे आज सेवानिवृत्त झाले. त्यांनी चार वर्ष मुख्याध्यापक पदावर काम पाहिले. विद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश पाटील सचिव रत्नाताई पाटील उपाध्यक्ष दिनकर पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी सरांना…

Read More

बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१०वी चा निकाल ९९.०२ टक्के

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभर घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात महात्मा गांधी विद्या प्रसारक मंडळ संचलित बबनबाई जवरीलाल यात हिरण माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कजगाव शाळेचा इयत्ता १० वी निकाल ९९.०२% लागला विद्यालयातून १०३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.२४ टक्के ; वैष्णवी धनगर शाळेत प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च २०२४ मध्ये राज्यभरात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात जळगाव येथील मानव सेवा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.२४% लागला असुन, त्यात ३० विदयार्थी विशेष प्राविण्यासह, २१ विदयार्थी प्रथम श्रेणीत तर०५ विदयार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.१) प्रथम…

Read More
error: Content is protected !!