जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एरंडोल येथील कार्यरत प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा विस्तार अधिकारी राजेंद्र देवचंद महाजन यांची राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष कैलास सांगळे व सचिन दादाराव मुसदवाले यांच्या सहीने नियुक्तीपत्र महाजन यांना प्राप्त झाले आहे.