नशिराबाद ( वास्तव पोस्ट ) : “महिला बचत गट” हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असून नशिराबाद मधील महिला बचत गटांना आर्थिक हातभार लावण्यासाठी २ कोटी रुपयांचे व्यापारी संकुल उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी या संकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. “रस्ते म्हणजे केवळ वाहतुकीचा मार्ग नाही, तर विकासाची रक्तवाहिनी असते. या मार्गावरून आता केवळ गाड्याच नाहीत, तर नशिराबाद सह इतर गावाचा आत्मविश्वास धावणार आहे” – अशा शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद–सुनसगाव काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी आपली भूमिका मांडली.
राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या नशिराबाद-सुनसगाव-बोदवड मलकापूर हा ५५ किमीचा रस्त्याचे मजबुती करणासह काँक्रिटीकरण प्रकल्पासाठी सुमारे २३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी सुनसगाव – नशिराबाद या ५ किमी रस्त्याचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

■ वाघुर पाणीपुरवठा योजनेलाही मिळणार गती
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “नशिराबादला शाश्वत पाणीपुरवठा मिळावा म्हणून वाघुर धरणावरून मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम देखील लवकर सुरू करण्यात येणार आहे. नशिराबाद करांसाठी निधीची कमतरता कधीही भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या रस्त्यामुळे शेतीमालाची वाहतूक सोपी होणार, विद्यार्थ्यांना शाळा – काॅलेजला जाण्यासाठी आरामदायक मार्ग मिळणार, आणि या मार्गावरील गावांचा सर्वांगीण विकास घडून येणार आहे. ग्रामस्थांनी याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले.
या भूमिपूजन सोहळ्यात, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील व माजी सरपंच विकास पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत सांगितले, “गुलाबराव पाटील हे नशिराबादच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांनी दिलेला निधी अविस्मरणीय आहे. नशिराबाद करांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अभिमान आहे. कार्यक्रमात लालचंद पाटील यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र पाचपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता इब्राहिम शेख यांनी मानले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे, जि.प. माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, गव्हरमेंट कॉनत्राक्टार मिलिंद अग्रवाल , शहरप्रमुख विकास धनगर, माजी सरपंच विकास पाटील, चंद्रकांत भोळे, पिंटू शेठ, युवासेना उप जिल्हाप्रमुख चेतन बऱ्हाटे, भाजप शहराध्यक्ष बापू बोढरे, युवा मोर्चा प्रमुख किरण पाटील, माजी नगरसेवक उल्हास पगारे, सुदाम धोबी, नितीन बेंडवाल, गणेश राजपूत, विशाल सोनवणे, प्रकाश कनगरे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
