जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात बीएएलएलबी आणि एलएलबी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ घेण्यात आला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले हे लाभले होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, डॉ. विजेता सिंग होते. यावेळी नुकतेच न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणून निवड झालेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पल्लवी चव्हाण, उदय खैरनार आणि प्रसाद डहाके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ. डी.आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहूजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, प्रा. शरद चव्हाण, प्रा. अमिता वराडे, प्रा. बी.एस. पाटील, डॉ. ज्योती भोळे, प्रा. नितीन मटकरी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. पाटील यांनी अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व नवनियुक्त न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तर ॲड. जंगले यांनी न्यायाधीशांनी मूल्यात्मक तटस्थ न्याय दानाचे काम केले पाहिजे असे आवाहन करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली. पल्लवी चव्हाण, अर्जुन खैरनार आणि प्रसाद डहाके यांनीही आपल्या मनोगतातून आपल्या यशातील महाविद्यालयाचे योगदान स्पष्ट करून कृतज्ञता व्यक्त केली. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनिही आपले मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शनात माजी विद्यार्थ्यांच्या यशस्वितेचा पट मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका घैसास हिने केले तर डॉ. अंजली बोंदर यांनी मान्यवरांचे आभार मानले.
