जळगाव ( वास्तव पोस्ट ) : नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा देशभरात महत्त्वपूर्ण परीक्षांचे आयोजन केले जाते . यांच्यामार्फतच देशभरात सर्व महत्वपूर्ण प्रवेश परीक्षा पार पाडण्यासाठी विविध स्तरावर पदाधिकाऱ्यांची सोबतच परीक्षा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते. के.सी.ई. सोसायटी संचलित ओरीयन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची सिटी कॉर्डिनेटर म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम परीक्षेसाठी नेमणूक करण्यात आलेली होती.
सैनिकी स्कूलच्या इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा महत्वपूर्ण मानली जाते. आज दि ५, शनिवार जळगाव जिल्ह्यात के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल येथे या परीक्षेचे आयोजन आज करण्यात आले. यात ४७३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. कोणताही गैरप्रकार न होता परीक्षा शांततेत पार पडली. परीक्षेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे ठरवून दिलेल्या प्रमाणे पूर्ण गोपनीयतेचे पालन करण्यात आलेले होते.
परीक्षा केंद्रावर सिटी कॉर्डिनेटर त्यांच्यासोबत ऑब्झर्वर उज्वल पाटील त्याचबरोबर सुपरवायझर आणि पुरेसा ऑफिस स्टाफ अशी कर्मचारी यंत्रणा कार्यान्वित होती. प्राचार्या सुषमा कंची यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या मेघना राजकोटिया आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
