रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी केले १५ हजार मिनिटे वाचन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनी आयोजित रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी १५ हजार मिनिटे वाचन केले. बुधवार १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गणपती नगरातील भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन नगरीत (रोटरी हॉल) महावाचन अभियानाचे आयोजन…
