Home » Archives for ऑगस्ट 2025

अतिवृष्टीग्रस्त भागास मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची प्रत्यक्ष भेट

अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील मारवड महसूल मंडळात दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे कळमसरे व वासरे येथे झालेल्या नुकसानीची पाहणी आज करण्यात आली. याप्रसंगी करनवाल यांनी आपतग्रस्त ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व आवश्यक ती मदत व उपाययोजनांबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याचे तसेच प्रशासन हे नागरिकांसोबत असून, नैसर्गिक…

Read More

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे चे दुःखद निधन झाले. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या या अभिनेत्रीची प्राणज्योत अखेर ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे चार च्या सुमारास मालवली. वयाच्या ३८ व्या वर्षी अभिनेत्रीने या विश्वाचा अखेरचा श्वास घेतला. श्रीकांत मोघे यांची सून…

Read More

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत सामंजस्य करार

सामंजस्य करारावेळी उपस्थित जैन इरिगेशनचे डॉ. के.बी.पाटील, अनिल पाटील सोबत डॉ. आर.सेल्वराजन यांच्यासह इतर मान्यवर तिरुचिरापल्ली ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद – राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (आयसीएआर – एनआरसीबी), तिरुचिरापल्ली यांच्यात केळी पिकावरील फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही (क्युकुम्बर मोजेक व्हायरस) या प्रमुख रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी नुकताच…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात १ सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे. या दिवशी विविध विषयांवरील तक्रारींबाबत तक्रारदार प्रत्यक्ष अर्जासह उपस्थित राहणार असून, संबंधित विभागप्रमुखांची…

Read More

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशनच्या वतीने सन्मास स्वीकारताना कंपनीचे सहकारी डॉ. बी.के. यादव व सोबत नास चे पदाधिकारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावातील जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड ही शाश्वत शेती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी आता नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस (NAAS) ची प्रतिष्ठित कॉर्पोरेट सदस्य बनली आहे. या सदस्यत्वाने कंपनीला कृषी संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रात…

Read More

अनुभूती बाल निकेतन व विद्यानिकेतनमध्ये गणेश मूर्ती निर्मितीचा उपक्रम उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्यानिकेतन या शाळांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून श्रीगणेशाच्या आकर्षक मूर्ती तयार करण्याचा उत्साही उपक्रम राबवला गेला. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, पर्यावरण जागरूकता आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदरभाव वाढावा, लहान विद्यार्थ्यांनी आपल्या कोमल हातांनी मातीला विविध आकार देऊन सुंदर गणेश मूर्ती साकारल्या, ज्यामुळे लहानांमध्ये कलेची आवड जागृत या…

Read More

‘हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘निसर्गकन्या’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहिणाबाईंच्या ओव्या आजही जनमानसात जीवंत आहेत. त्यांच्या काव्य साहित्यातून श्रमजीवी जीवन, निसर्गाचे सौंदर्य, स्त्रियांचे भावविश्व आणि ग्रामीण संस्कृती यांचे प्रतिबिंब ‘हिरिताचं देनं घेनं’ या श्रावण काव्यसंध्येत उमटले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त…

Read More

आत्मचिंतनासह चांगूलपणाला वंदन करा!’ – प. पू. डॉ. सुप्रभाजी म. सा.

।। आत्मोत्कर्ष वाणी ।। ज्याप्रमाणे एखादा उत्सवामध्ये मनुष्याच्या बाह्यभाग रंगतो, त्याप्रमाणे अध्यात्मिक पर्व म्हणजे पर्यषुण पर्व होय. यामध्ये मनुष्याचा आत्मचिंतनातून मोक्षचा मार्ग मिळत असतो. त्यासाठी ‘पर्व’ व ‘त्योहार-उत्सव’ याचा शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पर्व म्हणजे पवित्रता तर त्योहार म्हणजे दिवाळी, होळी यासह अन्य उत्सव. आवश्यक सुत्रानुसार सामाईक, चोवीसत्व आणि वंदन करावे. चांगल्या गुणांना वंदन…

Read More

अटल अमृत योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठा योजनेचा नवा अध्याय

छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथे,  छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनी व २६ द.ल.ली. क्षमता असणार्‍या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन संपन्न झाले. छत्रपती संभाजीनगर शहरात २०५० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून, यासाठी रु. १८०० कोटींच्या…

Read More

बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे लोक पुरस्कार – किरण डोंगरदिवे

कवयित्री बहिणाबाई चौधरींची जयंती बहिणाई स्मृति संग्रहालयात साजरी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘नको नको रे ज्योतिषा हात माझा पाहू…’ या बहिणाईंच्या काव्यपंक्ती आजच्या समाजाला जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान सांगून जाते. साधारणत: शंभर वर्षापूर्वी साहित्यातून बहिणाबाई चौधरी यांनी जो विचार समाजा पुढे ठेवला त्यातून आजची पिढी घडत आहे. अध्यात्मासह विज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे…

Read More

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनात मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्ट्म्स लिमिटेडचे अनिल जोशी, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया,…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक क्षेत्र वॉर रूम’ बैठक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक क्षेत्र वॉर रूम’ अंतर्गत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अमृत 2.0 अभियान, १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पायाभूत आरोग्य सुविधा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन…

Read More

विद्यापीठाचा “उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी” पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च जळगाव चे कर्मचारी जळगावातील विद्यापीठाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये कृष्णा गवळी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा तर्फे उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार याना लोकाभिमुखवृत्तीने शैक्षणिक प्रशासन व सेवा या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल उत्कृष्ट…

Read More

जैन हिल्स येथे पोळा मोठ्या उत्साहात साजरा

जैन हिल्स बैल पोळा निमित्त सर्जा-राजाची मिरवणुक प्रसंगी (डावीकडून) डॉ. अनिल ढाके, अन्मय जैन, अतुल जैन, अशोक जैन, अभेद्य जैन आदी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आदिवासी पारंपारिक नृत्य… विश्वगर्जना युवा सदस्यांचे  ढोलताशांच्या वादनासह सादरीकरण, पारंपरिक संबळ वाद्यावर कंपनीच्या विविध ठिकाणी कामावर असलेल्या सालदारांचे नृत्य… कृषीसंस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक……

Read More

जैन इरिगेशन कंपनीला प्रतिष्ठेचा स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन पुरस्कार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तिरुचिरापल्ली नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या कंपनीला आज भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे अत्यंत प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ पुरस्कार प्रदान करण्यात…

Read More
error: Content is protected !!