भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महापुरुषांच्या समता स्वातंत्र्य बंधुता न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये २५००० नेतृत्व निर्माण करण्यासाठी आज संपूर्ण देशभरामधील ३१ राज्यामध्ये विद्यार्थ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्याचाच भाग म्हणून जळगाव मध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. सदर प्रशिक्षणाचे उदघाटक निवृत्त उपशिक्षण अधिकारी सिद्धार्थ नेतकर…

Read More

पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला ; लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आणि प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळते की ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रशिक्षण शिबिराचाही समावेश आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानमधील ९…

Read More

के सी ई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात सिलॅब आणि लॅटेक्स सॉफ्टवेअर वर कार्यशाळा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या स्पोकन ट्युटोरिअल अंतर्गत विदयुत अभियांत्रिकी शाखेतर्फे तृतीय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी  तीस दिवसीय लॅटेक्स आणि सिलॅब या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . अद्ययावत सॉफ्टवेअर बाबत  विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या उद्देशाने भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत व आयआयटी मुंबईच्या संयुक्त विद्यमाने या…

Read More

सातपुडा जंगल सफारीच्या बुकिंग वेबसाईटचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांच्या २०२४-२५ च्या वार्षिक योजनेअंतर्गत सातपुडा जंगल सफारी पाल योजनेच्या बुकिंग वेबसाईटचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक नियोजनच्या प्रशासकीय आढावा बैठकीपूर्वी पार पडला. या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार…

Read More

‘फाली-२०२५’ च्या तिसऱ्या सत्राचा समारोप; शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा : शिवकुमार एस

फालीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अनिल जैन व व्यासपिठावर उपस्थित मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘फाली म्हणजे फ्युचर ॲग्रीकलर लिडर ऑफ इंडिया होय, त्याच फाली या शब्दाचा एफ- फॉर्मर सेंट्रीक, ए-ॲप्रेरिसियेट, एल – लार्ज गोल व लॉर्न टर्म, आय – इनोव्हेशन यावर काम केल्यास शेतीत बदल होऊ शकता त्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय उच्च ठेवले…

Read More

पिंप्री येथे बचत गटांसाठी “बहिणाबाई मार्ट” उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रभाग संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : घराच्या अर्थव्यवस्थेची खरी धुरीण म्हणजे महिला असून बचत गट हे घरासाठी दुसरी अर्थव्यवस्था आहे. महिलांनी स्थानिक व डिजिटल बाजारपेठ मिळवण्यासाठी प्रशिक्षणे घेवून उत्पादने दर्जेदार ठेवावीत, मिळालेल्या कर्जातून रोजगार निर्मिती, व्यवसाय वाढ व उत्पादनात नावीन्यता आणण्यासाठी वापर करावा. असे आवाहन करुन महिला गटांच्या उत्पादनांना…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उमर्टीत युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिर

चोपडा ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित सात दिवसीय निवासी युवा श्रम संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिराला आज दि. ४ मे २०२५ रोजी उमर्टी (ता. चोपडा) येथील पा.रा. भादले आदिवासी आश्रमशाळा येथे उत्साही वातावरणात सुरुवात झाली. शिबिराचा शुभारंभ महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुती हार अर्पण करून व स्वागत गीताने…

Read More

महाराष्ट्रात प्रथमच सामुदायिक रेडिओ केंद्राचे राष्ट्रीय संमेल्लन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतातील सर्वच राज्यातील सामुदायिक रेडिओ केंद्राच्या प्रतिनिधींना भारत सरकार तर्फे विशेष निमंत्रण देवून मुबंई च्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर,  येथे दि ३ मे २०२५ ला आयोजन करण्यात आले. जळगाव मू.जे. महाविद्यालयाच्या रेडीओ मनभावन ९०.८ एफ एम चे संचालक अमोल देशमुख हे खान्देश भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्र सरकारच्या माहिती…

Read More

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यापीठाला शैक्षणिक भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयातील प्रथम वर्ष  अभियांत्रिकी डेटा सायन्सचे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा व पुस्तक दीना निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वाचनालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, संशोधनपर पुस्तक बघितली व पुस्तकातील माहितीचा गोषवारा समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर  …

Read More

जैन हिल्स ला फालीच्या अकराव्या अधिवेशनाच्या तिसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांशी विद्यार्थ्यांचा संवाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जमिन कमी असली तरी चालेल मात्र त्याला व्यवसायीक दृष्टीने बघितले पाहिजे भांडवल, बाजारपेठ यासह जे जे नवतंत्र उपलब्ध आहे त्याचा वापर आवश्यकतेनुसार केला पाहिजे निर्यातक्षम उत्पादन घेतले पाहिजे. शेतीत सात्तत ठेवले पाहिजे, संघर्षाच्या काळातही ती करत राहिले पाहिजे, असा सल्ला शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI)…

Read More

स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

“कंपोस्ट खड्डा भरा, आपलं गाव स्वच्छ ठेवा” ,जिल्हास्तरीय मोहिमेचा शिरसोलीत शुभारंभ शिरसोली ( वास्तव पोस्ट ) : ही मोहीम केवळ एका खड्ड्यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा संकल्प आहे, स्वच्छता म्हणजे फक्त शासकीय कार्यक्रम नाही, ती आपल्या संस्कृतीची ओळख असून सामूहिक जबाबदारीआहे. आजवर आपण घरटी शौचालय उभारून पहिला टप्पा पूर्ण केला आहे….

Read More

म्हसावद –  बोरनार येथे लवकरच मोठा सौर प्रकल्प उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

म्हसावद ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागातील वीज म्हणजे शेतकऱ्याच्या पिढ्यांची आशा आहे. जिल्ह्यात कधीच निधीचा अडथळा होऊ दिला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी निधीची कधी कमतरता भासू दिली नाही, शेतकऱ्यांच्या शिवारात अंधार असू नये, त्याला दिवसा वीज मिळावी यासाठी कटिबद्ध असून पुढील टप्प्यात सौर प्रकल्प उभारणीवर भर दिला जाणार असून म्हसावद – बोरनार येथे…

Read More

जिल्हा नियोजन चा १% निधी आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : समाजात कुणीही मागे राहू नये… आणि दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे, तर संधी मिळाली पाहिजे, जिल्हा वार्षिक नियोजन च्या सर्वसाधारण च्या निधीतील १% निधी आता दिव्यांग सक्षमीकरणासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या अचूक आकडेवारी शिवाय योजना आखता येत नाहीत. म्हणूनच शासनाने ‘राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण’ हाती घेतलं असून…

Read More

‘फाली-२०२५’ च्या दुसऱ्या सत्राचा समारोप ; तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या : अशोक जैन

फालीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अशोक जैन व व्यासपिठावर उपस्थित मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल यासाठी आशा असते, त्यादृष्टीने ते प्रयत्न करतात. मात्र तंत्रज्ञानासोबतच कठोर परिश्रम करावेच लागेल. ‘कर्म हेच जीवन’ मानून नैतिकता, पारदर्शकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे…

Read More

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्या वर्षी १०० टक्के निकाल

सीआयएससीई बोर्डच्या निकालात १२ वीत क्रिषा राठोड तर १० वीत वेद भुसकाडे प्रथम जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे (सीआयएससीई) च्या दहावी व बारावी निकाल आज जाहिर करण्यात आले. त्यात अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. इयत्ता १२…

Read More
error: Content is protected !!