Home » Archives for एप्रिल 2025

आप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोशियशनच्या मान्यतेने व जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या सहकार्याने जळगाव जिल्हा हौशी कॅरम संघटना द्वारे आयोजित ७व्या आप्पासाहेब म्हसावदकर स्मृती जळगाव जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या नईम अन्सारी याने तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुरच्या रईस शेख याचा २–० सेटने पराभव करून विजेतेपदासह…

Read More

भुसावळ तालुक्यातील शिक्षक गुणवंतांचा गटसाधन केंद्रात गौरव

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांतर्गत तालुक्यातील शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव गटसाधन केंद्रामध्ये करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, बी.डी. धाडी, विषय तज्ञ शिक्षक सचिन पाटील, संजय गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी केंद्रप्रमुख पदावरून शिक्षण विस्तार अधिकारी पदी आशिक शेख यांची निवड झाली. राज्य मुख्याध्यापक संघातर्फे…

Read More

‘फाली-२०२५’ च्या पहिल्या सत्राचा समारोप ; इनोव्हेशनमध्ये जळगाव, बिझनेस प्लॅन स्पर्धेत पुणे जिल्हा प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरण वाढत आहे सोबतच औद्योगिक व नागरी वसाहतींसाठी सूपिक जमीनीचा वापर होतं आहे त्यामुळे शेतीउपयुक्त जमीन कमी होत आहे. यासोबतच हवामानातील बदलांसह अनेक संकंटे शेतीवर येत आहे. यावर भविष्यातील शेतीकरण्याची पद्धत बदलावी लागेल आधुनिक तंत्रज्ञानासह कमी पाण्यात व हवामानातील बदल स्विकारेल अशी बि-बियाणे, टिश्यूकल्चरची व्हायरस फ्री रोपांची…

Read More

जैन हिल्स ला आजपासून फालीचे अकरावे अधिवेशन सुरु; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा संवाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेती परवडत नाही असे म्हटले जाते ही नकारात्मकता दूर झाली पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतुन मिळते फक्त नियोजन करून तंत्रज्ञानासोबत शेतीपूरक व्यवसाय करावा. जेणे करून शेती परवडेल, लहानपणापासूनच शेतीविषयी आवड असेल तर यात यशस्वी होता येते. मजूरांची टंचाईसह अन्य समस्या निर्माण होत असतात, मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढावे लागते…

Read More

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण व आत्मशोधन या स्वविकासाच्या त्रिसूत्रीद्वारे आपले चरित्र बलवान बनवा. हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा. सगळ्यांमध्ये स्वतःला आणि सगळ्यांना स्वतःत पहा, तरच आपण स्वतःला गौरवान्वित समजाल. यातूनच प्रेम व सहनशीलतेचे दर्शन होईल; हिच गांधीजींची जीवनयात्रा आहे. असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार…

Read More

माजी विद्यार्थ्यी मेळावा : २६ वर्षांनी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन जागवल्या शाळेतील आठवणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे १९९९ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अशोक राणे शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव, शाळेचे माजी मुख्याध्यापक दिलीपकुमार चौधरी, माजी मुख्याध्यापिका वैजयंती तळेले, ज्येष्ठ शिक्षिका व्ही.एम.पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक पर्यवेक्षक नरेंद्र पालवे व्यासपीठावर…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) पिंपरी चिंचवड शहर ओ.बी.सी. सेल अध्यक्षपदी प्रशांत महाजन

पुणे ( वास्तव पोस्ट ) : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ओ.बी.सी. सेल अध्यक्षपदी तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते, खान्देश माळी मंडळाचे सदस्य, खान्देश विकास प्रतिष्ठान चे प्रशांत भास्कर महाजन यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ओ.बी.सी.सेल. अध्यक्ष कल्याणराव…

Read More

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जळगाव जिल्हा दौरा शनिवार दिनांक २६ एप्रिल आणि रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी असून या दौऱ्यात ते मुक्ताईनगर येथे होणाऱ्या मंगल कलश यात्रेच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. शनिवार, २६ एप्रिल रोजी रात्री ८:४५ वाजता राजधानी एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन करतील….

Read More

कृषि क्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने पुढील दहा वर्षांसाठीच्या मोठ्या विस्तार योजनांच्या नियोजनासह नुकतेच अकरावे वर्ष पूर्ण केले. दि. २७ एप्रिल ते ४ मे २०२५ या कालावधीत फाली ११ व्या अधिवेशनाचे आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम्स् लिमिटेड, जैन हिल्स जळगाव येथे करण्यात…

Read More

स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय ! पोलिसांची धाड ; व्यवस्थापकास अटक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहराच्या मध्यवर्ती भागात गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ एका मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देह विक्री व्यवसायाचा पोलिसांनी पडदा फाश केला. शुक्रवारी रात्रीच्या वेळी छापा घालत स्पा सेंटर मधून चार महिलांची सुटका करण्यात आली. सेंटरचा मालक व व्यवस्थापक यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यवस्थापकाला अटक…

Read More

के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन  सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी या परिसर मुलाखतीत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी ए आर एम एस इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी हजर होते. मुलाखतीत विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्य, सवांद, मिळवलेले…

Read More

४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पाॅण्डिचेरी येथे सुरू असलेल्या १६ वर्षा आतील ४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई. सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनल वाल्मिक हटकर हीची बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे नियुक्ती करण्यात आली. सोनलची या आधीही गोवा व गुजरात येथे नॅशनल…

Read More

जैन इरिगेशनच्या चौघं कॅरम पटूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरव

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय कॅरम पटू संदीप दिवे, अभिजित त्रिपणकर, योगेश धोंगडे तसेच आंतरराष्ट्रीय महिला कॅरमपटू नीलम घोडके यांचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुणे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा शानदार पुरस्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

जैन इरिगेशनचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास श्री शिव छत्रपती पुरस्कार घोषित

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील जैन इरिगेशन ह्या मानांकित कंपनीचा आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू योगेश धोंगडे यास सन २०२३–२४ करिता खेळाडू म्हणून “श्री. शिव छत्रपती पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.योगेश धोंगडे याची गेल्या ५ वर्षातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरिल उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र राज्य सरकारने कालच ह्या पुरस्कारांची घोषणा केली. योगेश धोंगडे यांच्या…

Read More

उत्तम आरोग्यासाठी आहारात केळीचे प्रमाण वाढवा : डॉ. के. बी. पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जागतिक केळी उत्पादनाच्या ३० टक्के केळी आपल्या भारतात उत्पादन होते. मात्र तिचे सेवन भारतीयांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. सर्वांगिण दृष्टीने विचार केला असता केळी हे पौष्टीक फळ आहे त्याचे दैनंदिन जीवनशैलीच्या आहारात समावेश केल्यास उत्तम आरोग्य राहिल त्यासाठी दररोज ‘दोन केळी खा आणि निरोगी रहा’ हा आरोग्याचा मंत्र…

Read More
error: Content is protected !!