मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा : व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मातंग समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची नोंदणी पूर्ण झाली असून, मातंग समाज आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी…
