जिल्हाधिकारी कार्यालयात ३ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनांक अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत…

Read More

प्रा.उमेश ठाकरे यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भूगोल दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी प्राध्यापक उमेश ठाकरे स्वामी विवेकानंद विद्यालय (स्वायत्त्य) जळगाव यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. ठाकरे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व, भौगोलिक माहिती त्याचबरोबर सूर्याचे भासमान भ्रमण इत्यादी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी होते. त्यांनी भूगोलाचा इतर विषयाशी कसा…

Read More

‘आत्मनिर्भर युवती अभियान’ कार्यशाळेत तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन

जळगांव ( वास्तव पोस्ट ) : दि.२२ जानेवारी २०२५ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगांव येथे आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील युवतींना योगासन, प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले व विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ.विजेता सिंग प्राध्यापक मणियार विधी महाविद्यालय जळगांव यांनी…

Read More

ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन 

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीन्वये दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते ०४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्णाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,…

Read More

नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाचे उद्घाटन

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे.  न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली विधी महाविद्यालये व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; ८ वाहने केली जप्त !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मोहाडी धानोरा रस्त्यावर आज मंगळवार दि. २८ रोजी मध्य रात्रीच्या सुमारास तालुका पोलीस स्टेशन तसेच महसूल पथक यांच्या संयुक्त कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. अवैध वाळू वाहतुकीला नागरिकांनी कमालीचा विरोध दर्शविल्यानंतरही अवैध वाळू सुरुच आहे. भरधाव जाणाऱ्या या वाहनांमुळे अनेक निरपराध नागरिकांचे बळी देखिल गेले…

Read More

गणिताची भीती दूर करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन गरजेचे : डॉ.चंद्रमौली जोशी

भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : गणित हा विषय अतिशय सोपा असून या विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळवता येऊ शकतात फक्त गरज आहे ती समजून घेण्याची व समजण्याची तयारी असली पाहिजे. खेळा खेळातून गणित शिकले पाहिजे. दैनंदिन व्यवहारांमध्ये गणिताशिवाय कोणतेही संभाषण अथवा व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कळत न…

Read More

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वन विभागाच्या सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण तसेच वन विभागाचे कॉफी टेबल बुक आणि सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपवन संरक्षक (वन्यजीव) जमीर शेख, जिल्हा नियोजन…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात गिलीयन बॅरे सिंड्रोमबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गिलीयन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजारावर पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी गिलीयन बॅरे सिंड्रोमच्या लक्षणांपासून उपचारांपर्यंत सविस्तर माहिती दिली. ■ आरोग्य विभागाची तयारी : सर्व्हेक्षण, ICU बेड्सपैकी 20% बेड GBS रुग्णांसाठी राखीव ठेवणे, SOP तयार…

Read More

युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, रक्षा खडसे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून प्रशासनाकडून या दौऱ्याबाबत दुजोरा प्राप्त झाला असून त्यांच्या या दौऱ्यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत- बुधवार दि २९ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता मुक्ताईनगर येथे आगमन होईल,दुपारी १२ ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत स्थानिकांसोबत व कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर येथील स्थानिक…

Read More

जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरण; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (मामा) भोळे, आमदार किशोर पाटील,…

Read More

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : शेतकऱ्यांच्या ओळखपत्रामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा…

Read More

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई महानगर प्रदेशातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होण्याकरिता सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करावे, महसूल व वन विभागांनी आवश्यक परवानग्या तातडीने देऊन भूसंपादन प्रक्रिया निश्चित वेळेत पूर्ण करावी. तसेच वन विभाग, एमएमआरडीए, सिडको…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना ! माथेफिरूने हातोड्याने तोडला पुतळा

पंजाब ( वास्तव पोस्ट ) : अमृतसर येथील सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज रस्त्यावर टाऊन हॉलजवळ असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड एका माथेफिरुने केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी लावलेल्या शिडीवर चढून पुतळ्यावर हातोड्याने वार केले. यामुळे हा पुतळा तुटला आहे. जवळ असणाऱ्या संविधान प्रतिमेची…

Read More

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ

राज्यातील २४ लाख ८७ हजार ३७५ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा लाभ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आज २७ जानेवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी तालुक्यातील १०…

Read More
error: Content is protected !!