Headlines
Home » Archives for नोव्हेंबर 2024

महाराष्ट्राच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा आंतरराष्ट्रीय गौरव ; प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संकल्पनेतून राबविलेल्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” ची निवड करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाने…

Read More

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि.३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय अभिजात संगीताचा व ‘खान्देशच्या रसिकांच्या सांस्कृतिक कक्षा रुंदावणारा महोत्सव’ म्हणून नावारूपास आलेल्या ‘बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि.३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार असल्याची माहिती पत्रकार…

Read More

‘शिवशाही’ बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू ; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

गोंदिया ( वास्तव पोस्ट ) : विदर्भात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यात एस.टी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघाताने एसटी महामंडळ हादरले आहे. या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते २० जणं गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या भीषण अपघातात मृतांचा आकडा…

Read More

महायुतीची आज मुंबईत होणारी बैठक अचानक रद्द ! एकनाथ शिंदे आपले मूळगाव दरे गावी रवाना !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्रातील मुख्यमंतत्रीपद तसेच सत्तास्थापन संदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी अनेक सूचना दिल्या. कालच्या बैठकीनंतर आज मुंबईत महायुतीची पुन्हा बैठक होणार होती….

Read More

सह्याद्री वाहिनीवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ३ डिसेंबर रोजी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार’ या विषयावर अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार…

Read More

रविवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतर जिल्हा २३ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी शाळेच्या मैदानावर शिरसोली रोड जैन हिल्स जळगांव येथे…

Read More

संविधान दिनाच्या औचित्त्याने महात्मा गांधींच्या जीवन प्रवासावर आधारित प्रदर्शनीचे उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनने बाल मोहन ते युवा मोहन या महात्मा गांधीजींच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित केलेली चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी मूल्य संस्काराच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मत शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संविधान दिनाच्या औचित्याने भाऊंच्या उद्यानात प्रदर्शनीचे उदघाटन नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाच्या प्राचार्या चारुलता पाटील, सेवानिवृत्त…

Read More

एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील तो मला मान्य !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील आपल्या निवास्थानी पत्रकार घेतली. मुख्यमंत्री निवडीच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेच्या सर्वात आधी त्यांनी मागील अडीच वर्षाच्या आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा लेखाजोखा…

Read More

के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी देशात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधान दिना निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. नागरिकांमध्ये…

Read More

मु.जे. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिवस

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माननीय प्राचार्य डॉ.स.ना. भारंबे यांनी भूषवले. कार्यक्रमाला मानव विद्या शाखेचे उपप्राचार्य डॉ.देवेंद्र इंगळे तसेच अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसुर उपस्थित होते. प्राचार्य भारंबे यांनी आपल्या मनोगतून संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून…

Read More

ओरियन सीबीएसई स्कूल मध्ये संविधान दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान दिनानिमित्त स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांना संविधानाची विस्तृत माहिती दिली. संविधान उद्देशिकेतील मूलभूत हक्क, कर्तव्य…

Read More

विभागीय बाॅक्सिंग स्पर्धेत तेजस कुमावत याचे घवघवीत यश ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अरुणामाई काॅलेज ऑफ फार्मसी मुमुराबाद तसेच बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ जळगाव फार्मसी काॅलेज चा विद्यार्थी तेजस ज्ञानेश्वर कुमावत याने दि.२४ नोव्हेंबर रोजी शिरपुर येथे झालेल्या विभागीय बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळविल्याने त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या बद्दल सर्व स्तरावरुन त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच…

Read More

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन प्रथम ; पटकावले सुवर्ण पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) चे गुजरातचे कार्यकारी संचालक आणि राज्य प्रमुख संजीब कुमार बेहरा हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. निरमा विद्यापीठाचे…

Read More

महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत पुण्याचा आरूष देशपांडे तर मुलींमध्ये सांगलीची भार्गवी भोसले विजयी

विजयी व उपविजयी खेळाडू्ंसमवेत डावीकडून अरविंद देशपांडे, प्रवीण पटेल, पोलीस उपधीक्षक संदीप गावित, रमेशदादा जैन, स्पर्धा संचालक कृपाल सिंह ठाकुर, महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनचे निरीक्षक प्रवीण गायसमुद्रे व पवन पाटील जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनतर्फे २३ ते २४ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते…

Read More

३४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व ; रत्नागिरी द्वितीय तर अमरावती तृतीय क्रमांकावर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ नोव्हेंबर २०२४ रोजी ३४ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तथा दहावी पुमसे राज्यस्तरीय स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत क्युरोगी या…

Read More
error: Content is protected !!