श्रीकांत शिंदेंवर संजय राऊतांकडून ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप !

मुंबई | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फाऊंडेशन मध्ये ५०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांनंतर मात्र राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तरात म्हटले की, “संजय राऊत हे मानसिक रुग्ण आहेत. त्यांनी…

Read More

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची उद्धव ठाकरे यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा

मुंबई | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज )– कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने आज महाविकास आघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राज्यातील संघटित व असंघटित कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली. यावेळी समितीच्या वतीने १५ मागण्याचे निवेदन मा. उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. या १५ मागण्याबाबत सहमती असल्याचे सांगून कामगारांच्या,…

Read More

बोरखेडा येथे भीम जयंती उत्साहात साजरी

धरणगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील बोरखेडा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती जल्लोषात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला बोरखेडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण बोरखेडा गावाचे सरपंच डॉक्टर विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य पूजा सत्यजित साळवे, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी यांच्या हस्ते…

Read More

जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जळगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा दिनानिमित्त १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. ‘आगीपासून सुरक्षितता सुनिश्चत करा, राष्ट्र उभारणीत योगदान द्या’ या संदेशासह वेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आज आग विझविण्यासाठी धारातीर्थी शहीद अग्रीशमन जवानांना जैन इरिगेशनच्या अग्रीशमन विभागाच्या सहकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण…

Read More

संत सेना महाराज मूर्ती शोभायात्रेत वैशालीताई सुर्यवंशी यांचा सहभाग

भडगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील गुढे येथे संत सेना महाराज मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कलश स्थापना व मूर्ती मिरवणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सहभागी होऊन आशिर्वाद घेतले. या संदर्भातील वृत्त असे की, गुढे येथे संत सेना महाराज यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली असून आजपासून…

Read More

सामाजिक क्रांतिचे शिल्पकार…

महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासंगी विद्वान होते. त्यांचे विचार चिरंतन राहिले आहेत. शाश्वत विचारांची शिदोरी देणा-या या युगपुरुषासमोर जगातील सर्व लोक आदराने नतमस्तक होतात. सामाजिक विषमतेविरुद्ध यशस्वी लढा देऊन हजारो वर्षापासून अंधारात गडप झालेल्या मूक समाजाला जागृत करण्याचे अलौकिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. कुत्र्या- मांजरापेक्षाही हीन जीवन जगणाऱ्या अखिल वंचित समाजाला “शिका, संघटित व्हा…

Read More

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात ‘इनकमींग’; डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह पाचोरा-भडगावातील पदाधिकार्‍यांचा प्रवेश

मुंबई | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग सुरूच असून आज ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध पदाधिकार्‍यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर पक्षात प्रवेश घेतला असून यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला बळकटी प्राप्त झाली आहे….

Read More

जळगावात महिलांच्या भव्य दुचाकी रॅलीने वेधले लक्ष

जळगाव | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह सोहळ्याची मोटारसायकल रॅलीने सुरवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे आज समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ शिरसाठ व उप उप अध्यक्षा भारती रंधे यांच्या…

Read More

नागदुली येथे वीज कोसळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एरंडोल तालुक्यामध्ये नागदुली शिवारात दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यावेळी शेतात अचानक वीज कोसळल्याने एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी ४ वाजता घडली. विज कोसळली तेव्हा मयत तरुणाचे वडील देखील शेतात होते. मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले. मयत श्रीकांत आणि…

Read More

बारा बलुतेदार समाजाच्या बैठकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार ; स्मिता वाघ यांना निवडून आणण्याचे आवाहन

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारतीय जनता पार्टीच्या जळगाव येथिल जिल्हा कार्यालयाकडून बारा बलुतेदार समाजाच्या पदाधिकारी यांना लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी व स्मिता वाघ यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यासाठी बारा बलुतेदार समाजाची मिटिंग बोलवण्यात आली होती. सदर मिटींगला मार्गदर्शन करण्यासाठी, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय…

Read More

सांगलीत हक्क सांगितला कॉंग्रेसने, उमेदवार उतरविला उद्धव गटाने; फासे मात्र वंचित कडेच

सांगली | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ साठी गेल्या अनेक दिवसांपासून सांगलीचा जागा वाटपाचा तिढा चालू होता. सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसने आपला हक्क सांगितला होता. इकडे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सांगलीत आपला उमेदवार आखाड्यात उतरवल्याचे जाहीर केले. आणि कुठल्याही परिस्थितीत ते आपली भूमिका बदलायला तयार नव्हते. त्यात वंचित…

Read More

महात्मा फुले जयंतीप्रसंगी, “शिक्षण हेच परिवर्तन घडवून आणण्याचे शस्त्र आणि शास्त्र” :आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा भव्य जयंती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी उपस्थित होते. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रताप गुलाबराव पाटील जिल्हा परिषद सदस्य, पवन सोनवणे, डॉ.मिलिंद बागुल…

Read More

कजगाव येथे रमजान ईद उत्साहात साजरी

कजगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर – कजगाव येथे रमजान ईद उत्सवात साजरी करण्यात आली. रमजान ईद हा मुस्लिम समाजाचा एक महत्त्वाचा सण आहे. एका महिन्याचे उपवास ( रोजे ) पूर्ण करून मुस्लिम बांधव हे रमजान ईद आनंदाने व उत्सवाने साजरी करत असतात. ईद निमित्त हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा…

Read More

कजगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

कजगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर – कजगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतात पहिली शाळा स्थापन करून आपल्या पुरोगामी विचाराची निर्भयपणे मांडणी करणारे स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कजगाव ग्रामपंचायत येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून…

Read More

महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त तसेच क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त म्हसावद येथे दि.११, गुरुवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन सकाळी ११:३० वाजता भोजनदानाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात…

Read More
error: Content is protected !!