शिवसेना-उबाठाच्या उमेदवाराला पाचोरा-भडगावातून मताधिक्य मिळवून देण्याचा आढावा बैठकीत निर्धार
पाचोरा | दि.२०( वास्तव पोस्ट न्यूज) -आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर येथील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक पार पडली. यात पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना-उबाठा पक्षाला सुटली असून याच्या उमेदवारीबाबत येत्या दोन दिवसात अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या आधी…
