केंद्राकडून ‘सूर्य घर-मोफत वीज योजने’ची सुरुवात ; ३०० यूनिट्स मोफत वीज !!!

मुंबई, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सौरऊर्जा आणि शास्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पंतप्रधान सूर्य घर-मोफत वीज योजना ‘ सुरु केली आहे. या योजने अंतर्गत साधारण १ कोटी घरांपर्यंत वीज घेऊन जाण्याचे तसेच प्रतिमहिना ३०० यूनिट्स पर्यंतची वीज मोफत देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. योजनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय…

Read More

एकनाथ खडसेंचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन ;राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच राहणार

जळगाव ,दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – एकनाथ खडसे हे भाजपात प्रवेश करण्यास उस्तुक असल्याच्या चर्चा असल्याचे पत्रकारांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यावर महाजन यांनी सांगितले की, याबाबत मला कुठलीही माहिती नाही. मात्र, एकनाथ खडसे हे वर दिल्लीवरून जोर लावून प्रयत्न करीत आहेत. याबाबत मला दिल्ली आणि राज्यातुन माहिती मिळाली….

Read More

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अशोक जैन यांना निमंत्रण

धुळे येथील स्वामी नारायण मंदिराचे प्रमुख आनंद स्वामीजी महाराज यांच्याकडून बीएपीएस मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारताना जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन जळगाव दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन परमपूज्य महंत स्वामीजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या…

Read More

प्रभाग १ मधील दुर्गंधीबाबत नागरिकांकडून मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव , दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज) – जळगाव शहरातील प्रभाग १ मधील कॉलनी स्थित असलेल्या जळगांव जिल्हा दूध उत्पादक संघ परिसरात मागील काही दिवसांपासून अतीदुर्गंधी पसरली आहे. यामुळे राधाकृष्ण नगर, इंद्रप्रस्थ नगर, महावीर नगर, सत्यम पार्क, राजमालती नगर इतर कॉलनी परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे . सविस्तर वृत्त असे की जळगांव जिल्हा दूध…

Read More

दिल्ली मोर्चा : आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या .

दिल्ली, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी दिल्लीकडे कूच केली आहे. केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी आजपासून ‘दिल्ली चलो’ मोर्चा सुरू केला आहे. पिकाच्या किमान भावाची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीवर मोर्चा काढण्यापासून रोखण्यासाठी उत्तर भारतातील पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. विरोध रोखण्यासाठी राजधानीला रेझर वायर, सिमेंट…

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा रद्द

दिल्ली , दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज )– केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १५ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु १५ तारखेला होणारा हा महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द झाला आहे. हा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १५ लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार…

Read More

पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील रिकाम्या डब्याला लागली आग

पुणे, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील रिकाम्या डब्याला रात्री आग लागली,अग्निशमन दलाच्या जवानांनी आग ३०मिनिटांच्या अथक प्रयत्नांनी आटोक्यात आणली .पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला लागलेली ही आग इतकी भीषण होती की, या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी…

Read More

अखेर अशोक चव्हाण यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात हा सोहळा पार पडला. मुंबई, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपा मध्ये पक्षप्रवेश केला .देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अशोक चव्हाणांच्या भाजपमध्ये येण्याने भाजप, महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे. सविस्तर वृत्त असे…

Read More

बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा ,दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही आज येथे दिली. बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल. राज्यातील बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली, त्यावेळी…

Read More

सलग चौथ्या दिवशी पुण्यात खूनाचा थरार… मोबाईल चोरीच्या संशयावरुन महिलेचा खून

पुणे दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पुण्यात खून सत्र काही थांबत नसुन सलग चौथ्या दिवशी पुण्यात खून झाला आहे .पुण्यात आज झालेल्या खुनाची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली असुन त्यावरून दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे .पोलिसांनी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले या आरोपींना ताब्यात घेतले असुन चौकशी केली असता त्यातील एकाचा मोबाईल…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात एसआरपीएफ जवानाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोली , दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उत्तम किसनराव श्रीरामे (३२) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहेत. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा…

Read More

निवडणूक कोणतीही असो माझ्या नावाची चर्चा होतेच ; पंकजा मुंडे

बीड, दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच, असं वक्तव्य भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. सध्या महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला नाही, असा प्रश्न निर्माण होत असल्याचंही पंकजा म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून सध्या पंकजा…

Read More

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – “आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे”, असे अशोक चव्हाण यांनी एक्स या सोशल मिडिया अकॉउंटवर पोस्ट करून माहीती दिली . सविस्तर वृत्त असे की आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज ज्येष्ठ नेते…

Read More

बहुमत चाचणीआधी विधानसभा अध्यक्षांचीच खुर्ची धोक्यात ! काय बिहारमध्ये होणार मोठा राजकीय खेळ ?

मुंबई, दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बिहारमध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे बिहारधील राजकीय वातावरण तापलं असून आज १२ रोजी एनडीए सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. मात्र एनडीएच्या बहुमत चाचणी पूर्वीच विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव मांडून मोठ्या घडामोडीला सुरवात झाली. बहुमत सिद्ध होण्यापूर्वी या प्रस्तावावर आज चर्चा होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर…

Read More

अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत २० महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप …!

राजस्थान, दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राजस्थानमध्ये सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली असुन येथील सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष आणि नगरपरिषदेच्या माजी आयुक्तांवर २० महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंगणवाडीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत या आरोपींनी महिलांवर अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे…

Read More
error: Content is protected !!