World Environment Day 2024 : निसर्गाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो.
चोपडा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दरवर्षी जगभरात ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जात असतो. पर्यावरणाच्या धोक्यांबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने आणि त्यामुळे होणारे नुकसान कसे टाळता येईल या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

दरम्यान आज चोपडा येथे जागतिक पर्यावरण दिवस निमित्ताने जमीर शेख मा. उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाने वनक्षेत्र चोपडा (प्रादेशिक) व सामाजिक वनीकरण चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमेश हाडपे सहा.वन संरक्षक ( वनी व वन्यजीव ) चोपडा, बी. के. थोरात म. वनक्षेत्रपाल चोपडा ( प्रादेशिक ) यांच्यासह चोपडा शहरात सायकल रॅली काढून पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी वृक्ष लागवड करून जागतिक पर्यावण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वनक्षेत्रातील सर्व वनरक्षक, वनपाल, वन मजूर, वनसेवक उपस्थित होते.
