Headlines
Home » आरोग्य » रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात स्तनपानाविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. यात क्लबच्या मेडिकल कमिटीच्या सदस्या, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉ. शीतल अविनाश भोसले यांनी स्तनपान विषयी महिलांना मार्गदर्शन केले.

बाळाला पहिल्या एक तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व, आई व गाईच्या दुधातील तफावत आणि २ वर्षांपर्यंत स्तनपान करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. स्तनपान करण्याची स्थिती व पकड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्तनपानाने स्त्रियांच्या सौंदर्यावर दुष्परिणाम होतो, हा गैरसमज त्यांनी दूर केला.

या कार्यक्रमासाठी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश सिंग व मानद सचिव संजय तापडिया, मेडिकल कमिटीच्या सदस्या डॉ. वैजयंती पाध्ये, डॉ. मूर्तजा अमरेलीवाला आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलचे अधिकारी संतोष नवगाळे यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!